Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa News: विद्यार्थी मारहाण प्रकरणी संशयित शिक्षिकेविरोधात गुन्हा

दैनिक गोमन्तक

Goa News: डिचोली तालुक्यातील एका प्राथमिक शाळेत एका शिक्षिकेकडून शाळेतील कोवळ्या मुलाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित संशयित शिक्षिकेविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणामुळे पालकांमध्ये खळबळ माजली आहे.

दुसऱ्या बाजूने हे प्रकरण मिटविण्यासाठी काही पालक प्रयत्न करीत असल्याची खात्रिलायक माहिती हाती आली आहे. तर मारहाण झालेल्या मुलाला शाळेत पाठविल्यास त्याच्यावर दबाव येण्याची भीती संबंधित मुलाच्या पालकांना वाटत आहे. मंगळवारी (ता.२८) या विद्यार्थ्याला पालकांनी शाळेतही पाठविले नव्हते, अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, विद्यार्थी मारहाण प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.२९) पालक-शिक्षक संघाची बैठक बोलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत मारहाण प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आपण मुलाला मारहाण केलेली नाही, असे संबंधित शिक्षिकेचे म्हणणे आहे. तसे तिने शाळेच्या प्रमुखांकडे स्पष्ट केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणात गुंता निर्माण झाला आहे. पोलिस चौकशीनंतरच प्रकरणामागील सत्य उघड होणार आहे.

मुलाच्या आईची तक्रार

ज्या शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंद झाला आहे, ती पॅरा शिक्षिका असल्याची माहिती मिळाली आहे. मारहाण करण्यात आलेला मुलगा झरीवाडा-पडोसे येथील आहे. मारहाण झालेल्या मुलाची आई विश्रांती गावकर यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीची दाखल घेत संशयित शिक्षिकेविरोधात भादंसंच्या 323 आणि बाल हक्क कायद्याच्या 8 (२) या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT