coastal security Dainik Gomantak
गोवा

Goa coastal: राज्याच्या किनारी सुरक्षेला येणार बळकटी; नौदल, तटरक्षक दलाचा संयुक्त सराव सुरु

आज पहाटे संयुक्त सरावाला झाला आरंभ

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: गोवा राज्य समुद्र किनारा सुरक्षा सरावाची सुरुवात आज ( 15 नोव्हेंबर 2022 रोजी ) पहाटे करण्यात आली. या सरावाचे आयोजन सर्व केंद्रीय आणि राज्य सुरक्षा एजन्सींच्या बरोबरीने मजबूत तटीय संरक्षण आणि किनारी सुरक्षा व्यवस्था स्थापन करण्यासाठीच्या उद्देशाने करण्यात आले आहे.

(A coastal security exercise between Indian Navy and Coast Guard has begun in goa)

सरावाचा भाग म्हणून भारतीय नौदल आणि तटरक्षक जहाजे किनारपट्टीवर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली होती. या सरावात गोवा राज्य सुरक्षा पोलिस आणि मत्स्यव्यवसाय विभाग, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि सीमाशुल्क किनारपट्टीच्या जवळ गस्त घालत सरात करत आहेत. तसेच अद्ययावत सागरी डोमेन जागरूकता राखत आहेत.

सराव दरम्यान गोव्याच्या किनार्‍यावरील सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी आणि वाढविण्यासाठी विविध एजन्सींद्वारे उच्च मूल्याच्या मालमत्ता आणि बिंदूंचे सुरक्षा ऑडिट केले जात आहेत. या सरावानतंर सुरक्षेसाठीची आव्हाने आणि बलस्थाने स्पष्ट होणार आहेत.

coastal security

गोव्याच्या किनार्‍यावरील सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी आणि वाढविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सराव होणार असल्याची माहिती समोेर आली होती. मात्र प्रत्यक्षात या सरावाला सुरुवात कधी होणार याबाबत स्पष्ट माहिती उपल्बध न्हवती. आजच्या आरंभाने या सर्व प्रश्नांना पुर्णविराम मिळाला असून गोव्याच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल संयुक्तपणे सराव करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT