''Goa Heritage Festival' म्हणजे संगीत, नृत्य, साहित्याची मेजवानीच'

गोवा हेरिटेज फेस्टिव्हलचे आज राजधानी पणजी येथे उद्धाटन
Goa Heritage Festival
Goa Heritage FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि लघुकथा लेखक दामोदर मावजो यांनी आज ( मंगळवारी ) पणजी येथे पाच दिवस चालणाऱ्या गोवा हेरिटेज फेस्टिव्हलचे उद्घाटन केले. यावेळी गोवा राज्याची संस्कृती, भाषेचे वेगळेपण आणि बहुभाषिकता या विषयावरुन उपस्थितांना मावजो यांनी संबोधित केले.

यावेळी बोलताना मावजो म्हणाले की, गोवा हेरिटेज फेस्टिव्हल (GHF) हा भारतातील सर्वात लहान राज्य असणाऱ्या गोव्याचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे वेगळेपण दर्शवतो. याद्वारे सर्वांसाठी हेरिटेज वॉक, चर्चा, संगीत, नृत्य, साहित्य आणि कविता, आणि मनोरंजन यांची मेजवानी असणार आहे. याचा आनंद सर्वांनी घ्यावा असे ही ते म्हणाले.

Goa Heritage Festival
Goa Tourism: कारवाईचा तडाखा कायम; बागा किनाऱ्यावर अवैध फेरीवाल्यांचे साहित्य जप्त

उपस्थितांना संबोधित करताना मावजो यांनी भाषेच्या माध्यमातून गोव्याच्या वेगळेपणावर भाष्य केले. मावजो म्हणाले की, गोवा राज्य अनेक दशकांपासून बहुभाषिक आहे. अनेक भाषा बोलणारे नागरिक राज्याचे भुषण आहेत. यामध्ये गोव्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मातृभाषा कोकणी महत्त्वाची भुमिका बजावत असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.

Goa Heritage Festival
Vijai Sardesai on Ration Scam : गोव्यात लुटारुंसाठी 'All is Well'; धान्य घोटाळ्यावरुन सरदेसाईंची बोचरी टीका

बहुभाषिकता ही गोव्याच्या रक्तात भिनली आहे. यातच गोव्याला निसर्गाने भरभरुन दिले आहे. यामूळे या बहुभाषिकतेला नवे आयाम मिळू शकले आहेत. मी या सर्वाचा साक्षिदार आहे. आणि याचा मला अभिमान आहे. असे ही ते म्हणाले. या उद्घाटन समारंभाला लेखक मावजो यांच्यासह गोवा हेरिटेज अॅक्शन ग्रुपचे अध्यक्ष डॉ. जोर्सन फर्नांडिस, कलाकार आणि लेखक लैला तयबजी, जीएचएजी चे सदस्य कार्लोस डीसूझा, हेता पंडित, पृथा सरदेसाई आणि इतर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com