Land Grab Dainik Gomantak
गोवा

Goa Land Grab Case: तक्रार नोंदवण्यासाठी वृद्ध मारतोय हेलपाटे, बनावट पॉवर ऑफ ॲटर्नी प्रकरण आले समोर

जमीन हडप : मृत नोटरीकडून बनावट दस्त

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Land Grab Case: गोव्यात बेकायदेशीरपणे जमीन हडपण्याची प्रकरणे वाढली असून दवर्ली येथे एका वृद्ध व्यापाऱ्याचे दोन प्लॉट बनावट पॉवर ऑफ ॲटर्नी करून विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ही कागदपत्रे ज्या नोटरीकडून तयार केली आहेत, त्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्या व्यापाऱ्याने केला आहे. मात्र, ही तक्रार नोंदवून घेण्यास मडगाव पोलिस तयार नाहीत.

बेकायदेशीररित्‍या जमिनी हडप करून लोकांना फसविणाऱ्या भू-माफियांच्‍या कचाट्यातून पीडितांची सुटका व्‍हावी आणि अशा भू-माफियांवर वचक बसावा, यासाठी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून एसआयटीची नेमणूक केली असली तरी मडगावचा हा वयोवृद्ध व्‍यापारी बनावटगिरी करून आपले दोन प्‍लॉट परस्‍पर विकल्‍याची तक्रार नोंदविण्‍यासाठी गेले कित्‍येक महिने मडगाव पोलिस स्‍थानकावर हेलपाटे मारत आहे.

ही गोष्‍ट आहे मडगावातील कपड्यांचे व्‍यापारी मुसा सालेह महंमद यांची. मुसा यांचे पूर्वी मडगाव बाजारात कपड्यांचे दुकान होते. मात्र आता वयोमानामुळे त्‍यांना धड चालणेही कठीण होते.

अशाही स्‍थितीत आपल्‍याला न्‍याय मिळावा यासाठी ते मडगाव पोलिस स्‍थानकावर खेपा मारत आहेत. मात्र, त्‍यांची केस नोंद करून घेण्‍यासाठी कुणीही तयार नाही.

मुसा यांनी दिलेल्‍या तक्रारीनुसार, दवर्ली येथील झरीवाडीमळ येथे त्‍यांना सासऱ्याच्‍या इस्‍टेटीतून दोन प्‍लॉट मिळाले होते. मात्र, त्‍यांची बनावट पॉवर ऑफ ॲटनी करून राजदीप कुंडईकर (रा. बाणावली) आणि सलीम दोडामणी (रा. मोतीडोंगर, मडगाव) या दोघांनी भलत्‍यांनाच विकली.

हा व्‍यवहार करण्‍यासाठी जी पॉवर ऑफ ॲटर्नी केली होती, ती रमेश कामत हळदणकर या नोटरीद्वारे केली होती. प्रत्‍यक्षात या नोटरीचा सप्‍टेंबर 2014 मध्‍ये मृत्‍यू झाला आहे. त्‍यानंतर जी सक्‍शेशन डिड तयार केली, तीही बनावट असल्‍याचा मुसा यांचा दावा आहे.

दक्षिण गोव्‍याचे पोेलिस अधीक्षक अभिषेक धनिया यांचीही त्‍यांनी भेट घेतली. मात्र, अजून त्‍यांची तक्रार नोंद करून घेतलेली नाही.

या प्रकरणात गुंतलेले संशयित आहेत, ते काही पोलिस अधिकाऱ्यांना जवळचे असल्‍यानेच त्‍यांच्‍यावर कारवाई केली जात नाही, असा त्‍यांचा आरोप आहे.

एसआयटीसाठी प्रकरण नगण्य

याप्रकरणी मे 2020 मध्‍ये त्‍यांनी मडगाव पोलिस स्‍थानकात तक्रार नोेंदवण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, पोलिसांनी त्‍यांनाच धमकावून ही तक्रार मागे घेण्‍यासाठी दडपण आणले.

अशी प्रकरणे हाताळण्‍यासाठी जेव्‍हा एसआयटीची स्‍थापना केली, त्‍यावेळी त्‍यांनी एसआयटीकडेही तक्रार दिली. मात्र, या प्रकरणाची व्‍याप्‍ती कमी असल्‍यामुळे एसआयटीने ती पुन्‍हा मडगाव पोलिसांकडे पाठवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT