Keri - Sattari: केरी-सत्तरी येथे 15 वर्षीय मुलगा बुडाला

कुटुंबीयांसोबत आंघोळ करताना प्रकार घडला
Keri - Sattari
Keri - SattariDainik Gomantak
Published on
Updated on

Keri - Sattari केरी-सत्तरी येथील घोटेली नं. एक येथील पोलिस चौकीच्या मागील कळसकोण नदीत आज, रविवारी दुपारी एकच्या सुमारास 16 वर्षीय विद्यार्थी दीपेश नामदेव गावस (रा. गावसवाडा-केरी) याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गावसवाडा-केरी येथील दीपेश गावस यांचे कुटुंब आंघोळीसाठी कळसकोण नदीपात्रात आले होते. यावेळी दीपेश आंघोळीसाठी उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

यावेळी ग्रामस्थांनी दीपेशला पाण्यातून बाहेर काढले. 108 रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्याचवेळी वाळपई पोलिस आणि वाळपई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, दीपेश याचा मृत्यू झाला होता.

कळसकोण : मृत्यूचा सापळा

हा परिसर अत्यंत धोकादायक असून आतापर्यंत येथे अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे नदीपात्र खोल असून येथे भोवरा तयार होतो. त्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही. या नदीपात्रात आंघोळ करणे धोक्याचे आहे.

आज असाच दुर्दैवी प्रकार दीपेशच्या बाबतीत घडला. दीपेश हा हुशार मुलगा होता. त्याने एप्रिल 2023 मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा दिली होता.

तो सरकारी माध्यमिक विद्यालय, केरीचा विद्यार्थी होता. त्याच्या मृत्यूमुळे केरी भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Weather Forecast IMD
Goa Amar Bandekar Case
Sattari River Drowning Cases
Goan Farm brand Keri Sattari
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com