Accident At Bambolim Dona Paula Road Dainik Gomantak
गोवा

Accident In Goa: चाक निखळून कार दुभाजकाला धडकली; बांबोळी दोनापावला मार्गावर मोठा अपघात

अपघातात सुदैवाने जिवीतहानी झाली नाही

Rajat Sawant

Accident In Goa: 2022 च्या तुलनेत 2023 सुरू झाल्यापासून गोव्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिस यंत्रणेकडून कडक कारवाई, रस्ते सुरक्षा आठवडे, रस्ते अपघातांविषयी जागृती करण्याचे उपक्रम सुरु आहेत.

परंतु त्याचा हवा तेवढा फायदा होताना दिसत नाही. बांबोळी दोनापावला मार्गावर आज सोमवारी दुपारी एका कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बांबोळी दोनापावला मार्गावर आज बलेनो कारचा अपघात झाला. कार डिव्हायडरवर धडकल्याने हा अपघात घडला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

कारची धडक इतकी जोरात होती की कारचा चालकाच्या बाजूचा पुढील टायर निकळून बाहेर पडला तर प्रथमदर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातामुळे कारचे ऑईल रस्त्याच्या कडेला सांडले आहे. यावेळी मार्गावरील वाहतूक थोडा काळ ठप्प झाली होती.

दरम्यान अशीच एक अपघाताची घटना पर्वरीतून समोर आली होती.  पर्वरीतील आर. जी. हॉस्पिटलसमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन चारचाकींमध्ये जोरदार धडक बसली होती.

अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये चालकासह अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT