Amit Aatkar Dainik Gomantak
गोवा

राष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या ए आणि बी टीमनेच सहकार्य केलं - अमित पाटकर

अमित पाटकर यांनी भाजप, आरजी अन् आपवर केला आरोप

Sumit Tambekar

भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीचे मतदान 18 जुलै रोजी पार पडले. यावरुन गोव्यात क्रॉस व्होटिंगचा विषय चांगलाच गाजतो आहे. यावरुन काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप - प्रत्यारोप होत आहेत, या निमित्ताने गोवा काँग्रेसच्या तीन नेत्यांकडून क्रॉस व्होटिंग झाले. अशी ही चर्चा आहे, कारण द्रौपदी मुर्मू यांना गोव्यातून 40 पैकी 28 मते मिळाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे विरोधकांची 3 मते फुटली, ती काँग्रेसची असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. यावरुन अमित पाटकर यांनी भाष्य केलं. (A and B team of Goa BJP cooperated for presidential election 2022 - Amit Patkar )

पाटकर म्हणाले की, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाले आहे. यात भाजपच्या A आणि B टीमने सहकार्य केले आहे. त्यामूळे गोवा काँग्रेस नेत्यांवर केलेला आरोप तथ्यहीन आहे. गोवा काँग्रेस नेत्यांनी केलेले मतदान हे ठरल्याप्रमाणे केले आहे. त्यामूळे क्रॉस व्होटिंग कोणी केले. हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

पाटकर म्हणाले की, भाजपची A आणि B टीम म्हणजेच आम आदमी पार्टी आणि रिवोल्यूशनरी गोअन्स पार्टी यांनी या निवडणूकीत भाजपला मदत केली आहे. त्यामूळे काँग्रेसच्या नेत्यांवर मतदानाच्या बाबतीत संशय घेण्याचे कारण नाही. असे ते म्हणाले. त्यामूळे गोव्यातील राष्ट्रपती मतदानावरुन सुरु असलेली चर्चा आता संपली आहे. असे ही ते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT