Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

कुंभारवाडा येथे दुचाकी अपघातात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

दुचाकीवर मागे बसलेला स्वप्नील सोलेकर (23 वर्षे) जखमी असून त्याच्यावर गोमेकॉमध्ये उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमन्तक

गोव्यातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण हे चिंतेचे कारण बनले आहे. दर एक दिवसाआड अपघाताच्या घटना घडत आहेत. वाहतूक पोलीस विभागातर्फे योग्य ती खबरदारी आणि जनजागृती करूनही या घटनांमध्ये काहीच कमी आल्याचे दिसून येत नाही.

वेर्णा येथे कामाला असणाऱ्या रामनगरमधील (कर्नाटक) सूरज म्हाळकर या 22 वर्षीया तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात कुंभारवाडा येथे झाल्याची माहिती समोर आली आहे.

काल (मंगळवारी) रात्री वेर्णा येथून कामावरून परतत असताना सूरज याच्या दुचाकीची खांबाला जोरदार धडक बसली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला स्वप्नील सोलेकर (23 वर्षे) जखमी असून त्याच्यावर गोमेकॉमध्ये उपचार सुरु आहेत.

दरम्यान, पर्वरीच्या दिशेने जाणाऱ्या कदंब बसवरील चालकाचे नियंत्रण गेल्याने बसने पर्वरी येथील मॉल दी गोवा जवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला आदळून पुढे जाऊन झाडाला धडक दिली. हा अपघात काल सकाळी 10.25 च्या सुमारास घडला. अपघातात वाहक व चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पर्वरी पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT