Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: रविवारची सकाळ ठरली दुर्दैवी; पणजीत झाड कोसळून 19 वर्षीय तरुणीचा अंत

Goa: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडत असणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी जीवीतहानीसह मोठी वित्तहानी झाली आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडत असणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी जीवीतहानीसह मोठी वित्तहानी झाली आहे. राजधानी पणजीतही अनेक ठिकाणाहून पावसामुळे पडझडीच्या घटना समोर आल्या आहे. यातच आज, (रविवारी) नेहमीप्रमाणे कामासाठी निघालेल्या आरतीचा काळाने घात केला.

आज सकाळी 10-10.30 च्या दरम्यान जोरदार वाऱ्यामुळे राजधानीतील मेरी इमॅक्युलेट चर्च जवळील पालिका गार्डनसमोरील रस्त्याशेजारील झाड पडले. यावेळी कामासाठी जात असलेली 19 वर्षीय युवती आरती गोंड झाडाखाली सापडली. त्यात ती गंभीर जखमी झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी ताबडतोब तिला बाहेर काढत 108 रुग्णवाहिकेमधून गोमेकॉत दाखल केले. तिच्यावर सकाळपासून उपचार चालू होते. मिळालेल्या माहितीनुसार, आता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मयत युवती आरती गोंड (वय 19) रामनगर बेती येथील रहिवासी आहे.

बाबुश मोन्सेरात यांचे निर्देश

झाड पडून युवतीच्या मृत्यूची घटना दुर्दैवी. मी लोकांना विनंती करतो की त्यांनी जीर्ण झाडांबाबतीत खबरदारी बाळगावी व अशा झाडांखाली वाहने लावू नयेत. वन खात्याकडून राजधानी पणजीतील धोकादायक झाडांबाबत अहवाल मागवून घेण्यासंबंधी मी पणजी महापालिकेच्या आयुक्तांना निर्देश दिले आहेत, असे पणजीचे आमदार मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT