रविवारी सकाळी पणजी मेरी इमॅक्युलेट चर्चजवळील पालिका उद्यानाकडे रस्त्याशेजारील झाड पडून जखमी झालेल्या युवतीचा उपचारादरम्यान जीएमसीत निधन. आरती गोंड (वय 19) असे त्या मयत युवतीचे नाव आहे.
बेतोडा-बोरी येथील बायपास रस्त्यावर चालकाचा ताबा ट्रकवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल.
कुठ्ठाळी येथे दरड कोसळल्याने क्लिप वाझ यांच्या घराचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आमदार संकल्प आमोणकर आणि अंतोन वाझ यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन भेट दिली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाचे लोकही घटनास्थळी पोहोचले.
हळदोणा ग्रामसभेत पर्यट धोरणाच्या मसुद्याला एकमताने विरोध करण्यात आला आहे. तसेच देवनागरी लिपीसोबत रोमन लिपीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळवण्याचा ठराव मांडला.
श्रीलंकेकडे निघालेल्या मालवाहू जहाजाला गोवा हद्दीतील समुद्रात आग लागली. आग अद्याप धूमसत असून अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आग नियंत्रणात असली तरी पूर्णपणे आटोक्यात नाही. शनिवारी हेलिकॉप्टरद्वारे कोरडी रासायनिक पावडर पसरवल्याने आग आटोक्यात आली. भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक मनोज भाटियांची माहिती.
वेळसाव पंचायतीने दक्षिण गोव्यातील सनबर्न फेस्टिव्हलला विरोध करत रोमन लिपीला समान दर्जा देण्यास पाठिंबा देण्याचा मांडला ठराव. दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
कारापूर सर्वण पंचायतीला MRF शेडसाठी जागा दिल्याबद्दल पंचायत मंडळाकडून मंत्री विश्वजीत राणे आणि प्रतापसिंह राणेंचे अभिनंदन. अभिनंदन लोढा मेगा हाऊसिंग प्रकल्पासाठीची जागा खुद्द 'बाबांची' असा पंचायत मंडळाचा युक्तिवाद. ग्रामस्थांकडून प्रकल्पाविरुद्ध विरोधाची धारही मवाळ.
कारापूर सर्वण पंचायत क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक 148/0तील 4 लाख 26 हजार स्क्वेअर मीटर जमिनीत फक्त प्लॉट करण्यासाठी पंचायतीने एनओसी दिलेली आहे. मेगा बांधकाम प्रकल्पासाठी पंचायतीकडे एनओसीसाठी अर्ज आलेला नाही आणि पंचायतीने एनओसी दिलेली नाही. कारापूर सर्वण पंचायत मंडळाची ग्रामसभेत माहिती.
मांद्रे येथील ब्राम्हण देवस्थान मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास करण्यात आली. आता याप्रकरणी मांद्रे पोलिसांकडून दीपक पांडू निकम ( 35, राहणार पेडणे, मूळ महाराष्ट्र) याला अटक करण्यात आली आहे.
कारापूर-सर्वणच्या ग्रामसभेत सुरुवातीलाच विठ्ठलापूर येथील मिनरल वॉटर प्रकल्पाला दिलेल्या 'एनओसी'चा मुद्दा तापला. पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.