Voting DainiK Gomantak
गोवा

Lok Sabha Election 2024: गोव्यातील इंडियन रिझर्व्ह बटालियनचे 920 पोलिस मतदानापासून राहणार वंचित?

Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या निवडणुकीसाठी गोव्यातील इंडियन रिझर्व्ह बटालियनचे 920 पोलिस इतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी पाठवण्यात आले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या निवडणुकीसाठी गोव्यातील इंडियन रिझर्व्ह बटालियनचे 920 पोलिस इतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र या पोलिसांना मतदान करण्यासाठी कोणतीच व्यवस्था करण्यात आली नसल्याने ते मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या पोलिसांना मतदानाचा हक्क असल्याने त्यावर पर्याय देण्यासाठी गोव्यातील मुख्य निवडणूक कार्यालयातर्फे यापूर्वीच पत्र पाठवण्यात आले असून दुसऱ्यांदा स्मरणपत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्राने दिली.

राजस्थान, गुजरात व झारखंड येथील लोकसभेच्या निवडणुकीवेळी चोख बंदोबस्तासाठी गोव्यातील आयआरबी पोलिसांना पाठवण्यात आले आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने मतदान होणार आहे. त्यामुळे या पोलिसांना या राज्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात केले जाणार आहे.

राजस्थान येथील मतदानानंतर ते गुजरात व झारखंड या राज्यांमधील मतदान दिवशी तैनात केले जाणार आहे. त्यामुळे गोव्यात होणाऱ्या ७ मे च्या मतदानाला ते मुकणार आहे. घटनेत प्रत्येकाला मतदानाचा हक्क दिलेला आहे. हा हक्क कोणालाही हिरावून घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे एखादा पोलिस यासंदर्भात पोलिस मतदानाच्या हक्कासाठी न्यायालयात गेल्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, असे मत एका राज्य वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्याने व्यक्त केले.

निर्णय निवडणूक आयोगाचा

दरम्यान, जे गोमंतकीय मतदार कामानिमित्त गोव्याबाहेर आहे त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्यात आली असताना निवडणुकीसाठी कायदा व सुव्यवस्थेची ड्यूटी करणाऱ्यांवर हा अन्याय आहे. हा मतदानाचा फटका गोव्याबरोबरच इतर काही राज्यांतील निमलष्करी दलाच्या पोलिसांना बसणार आहे. आयआरबी पोलिसांना गोव्याबाहेर ड्युटीवर असताना मतदान करण्यास मिळणार नाही याचा पोलिस खात्याचा काहीही संबंध नाही. तो निर्णय निवडणूक आयोगाचा आहे, असे मत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT