Lok Sabha Election 2024: भाजपचा प्रचाररथ 'सुसाट'; 3 तारखेला अमित शाह यांची गोव्यात धडाडणार तोफ

Lok Sabha Election 2024: दक्षिण गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी समाधान व्यक्त केले.
Home Minister Amit Shah
Home Minister Amit ShahDainik Gomantak

Lok Sabha Election 2024: भाजपने प्रचारात गती घेतली असून उद्या प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्यासोबत पेडणे ते अस्नोड्यापर्यंतचा दौरा करणार आहेत. २ रोजी फोंडा येथे, ३ रोजी म्हापसा येथे जाहीर सभा, तर ४ रोजी मडगाव येथे ‘रोड शो’ आयोजित केला आहे. या साऱ्याचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मगोचे नेते व सरकारचे समर्थन करणारे अपक्ष आमदार यांची संयुक्त बैठक आज दुपारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली, काँग्रेस हा जातीयवादी पक्ष असून धर्म, जातीवर आधारीत काँग्रेस राजकारण करते. हे त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यावरूनच स्पष्ट होते, असा आरोप त्यांनी केला.

संपत्तीचे फेरवाटप कसे केले जाईल याचे उत्तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले, गोव्याला केंद्राकडून विशेष वागणूक दिली जात असल्याने विशेष दर्जापेक्षा अधिक महत्त्व मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याशी भावनिक नाते असल्याचे स्पष्ट करत विकासाच्या गोवा मॉडेलसाठी काहीच कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जाहीरपणे दिली आहे. ओसीआय मुद्यावर केंद्राने तोडगा काढल्याने येथील गोमंतकीयांच्या जमिनी सुरक्षित राहणार आहेत. आदिवासी बांधवांना राजकीय आरक्षण देण्यासाठी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. प्रभू रामांच्या काळापासून येथे मच्छीमार बांधव आहेत, त्यांच्या सीआरझेडमध्ये येणाऱ्या घरांना पूर्ण संरक्षण दिले जाईल यात शंकाच नाही.

3 रोजी अमित शहा यांची सभा

दक्षिण गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी समाधान व्यक्त केले. येत्या २ मे रोजी संध्याकाळी ५.३० वाजता फोंडा येथे भाजपाची जाहीर सभा होणार आहे. तसेच ३ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता म्हापसा येथे गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे. रालोआ गटाच्या सदस्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणूक व इतर मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत कृषिमंत्री रवी नाईक, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये, आंतोन वाझ, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, मगोचे आमदार जीत आरोलकर, भाजपचे दक्षिण गोवा समन्वयक विनय तेंडुलकर आदी सहभागी झाले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेला हे नेते उपस्थित होते.

Home Minister Amit Shah
Pramod Sawant Birthday: PM मोदींनी दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, सावंतांनी जनतेकडे काय मागितले बर्थडे गिफ्ट?

मुख्यमंत्री म्हणाले...

1- यंदाची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. यामुळे समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूक, महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण देणाऱ्या नारी अधिनियमाची अंमलबजावणी, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी आदी राष्ट्रीय विषयांना प्राधान्य दिले जाणार आहे.

2- ‘अबकी बार ४०० पार’, या घोषवाक्याद्वारे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या जनतेला जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण केली जाणार आहेत याची ‘मोदी की गॅरंटी’ आहे. जगात अकराव्या स्थानावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था आता पाचव्या स्थानावर पोहोचली आहे.

3- भारताला अव्वल तीन देशांच्या यादीत नेण्यासाठी ‘राष्ट्र प्रथम’ या तत्त्वावर विचार करण्याची गरज आहे. यासाठी भाजपाला मतदान केले पाहिजे. ‘वारसा कर’सारखी आश्वासने देणाऱ्या काँग्रेसचा जाहीरनामा धार्मिक आहे. गोव्यात सर्वधर्म समभाव असल्याने ७ मे रोजी शांततेत मतदान होणार आहे.

Home Minister Amit Shah
Goa CM Pramod Sawant: कर्नाटकात लय जबरा फसले सीएम सावंत; अचानक हॉटेलची लिफ्ट बंद झाल्यानं उडाली भांबेरी

वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले

म्हादईप्रश्नी पहिले पत्र कोणी दिले, २००८ साली खाण क्षेत्रात अराजकता माजवून अनियमितपणाने उत्खनन मर्यादेचे उल्लंघन करत ६२ दशलक्ष टन खनिज उत्खनन कोणी केले, त्यावेळी कोणते मंत्री खाण व्यवसायात होते, रेल्वे दुपदरीकरणाचा आराखडा २०१२ पूर्वी काढण्यात आला, तेव्हा रालोआचे सरकार होते की पुलोआचे याची उत्तरे विरोधकांनी शोधली पाहिजेत. दोन्ही जागांवर भाजपाचे उमेदवार जिंकणार यात शंकाच नाही. उत्तरेतून श्रीपाद नाईक एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील. दक्षिणेत पल्लवी धेंपे यांना ४० हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com