Taxi  Dainik Gomantak
गोवा

आतापर्यंत गोव्यात 9001 टॅक्सींना डिजीटल मीटर

अडीच महिन्यांत 125 टॅक्सींना दंड

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील कोरोना महामारीचे सर्व निर्बंध उठवण्यात आल्याने पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू झाला आहे. आतापर्यंत राज्यातील 9001 टॅक्सींना डिजीटल मीटर बसवण्यात आले आहेत, तर नोंदणी केलेल्या 67 टॅक्सींना ते बसविण्याचे काम सुरू आहे. परवान्याची मुदत संपल्यानंतर डिजीटल मीटरविना व्यवसाय करणाऱ्या 125 टॅक्सीचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

गोवा खंडपीठाने राज्यातील सर्व टॅक्सींना डिजीटल मीटरची सक्ती केली होती. त्याला विरोध करून सादर केलेल्या याचिका खंडपीठाने फेटाळल्या होत्या व त्यावर निवाडा दिला होता.

वाहतूक खात्यानेही कठोर भूमिका घेत डिजीटल मीटर बसविलेल्यांनाच वाहतूक व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देत इतरांविरुद्ध कारवाई सुरू केली होती. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करताच टॅक्सीचालक डिजीटल मीटरविना व्यवसाय करत असल्यासंदर्भात अवमान याचिका टुर्स अँड टुरिझम एसोसिएशन ऑफ गोवातर्फे (टीटीएजी) सादर झाली होती. त्यावरील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने देखरेख ठेवून स्थितीजन्य अहवाल वारंवार सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ही सुनावणी आता खंडपीठाच्या निर्देशानुसार वाहतूक संचालकांनी डिजीटल मीटर तसेच केलेली कारवाई यासंदर्भातचा अहवाल सादर केला. यापूर्वी हा अहवाल 15 नोव्हेंबर 2021, 29 नोव्हेंबर 2021, 13 डिसेंबर 2021 व 12 जानेवारी 2022 रोजी सादर केला गेला होता. त्यानंतर आज नव्याने अहवाल सादर केला आहे. आज 14 मार्च 2022 रोजी सादर केलेल्या अहवालात गेल्या अडीच महिन्यात डिजीटल मीटर बसवलेल्यांची संख्या 9001 वर पोहचली आहे, तर 71 जणांनी मीटरसाठी रोझमाल्टा (आरएपीएल) या कंत्राटदाराकडे नोंदणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: नागेशीत 'गोविंदा रे गोपाळा'च्या गजरात दही हंडी साजरी

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT