पक्षाच्या कोअर कमिटीचा पाठिंबा असल्याने प्रमोद सावंतांच्या निवडीला अनुकूलता

तयारी ‘शपथविधी’ची: विधिमंडळ नेतेपदाची निवड 16 मार्चला
प्रमोद सावंत
प्रमोद सावंतDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विधानसभा निवडणुकीत भाजपला काठावरचे बहुमत मिळाले. मात्र, अपक्ष आणि मगो पक्षाने बिनशर्त पाठिंबा दिल्याने भाजपने बहुमताचा आकडा पार करूनही विधिमंडळ नेता निवडण्याची प्रक्रिया रखडली होती. आता विशेष निरीक्षकांची निवड झाली आहे. दुसरीकडे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बहुसंख्य आमदार आणि पक्षाच्या कोअर कमिटीचा पाठिंबा असल्याने सावंत यांच्या निवडीला अनुकूलता दिसत आहे.

तीन अपक्ष आणि दोन मगो पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर भाजपकडे बहुमतासाचा 21 हा आकडा पार करण्यात यश आले. पण विविध कारणाने विधिमंडळ नेता निवडीची प्रक्रिया रखडली होती. अखेर पक्षांतर्गत दबाव वाढल्याने या नेता निवडीच्या प्रक्रियेला गती आली असून केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंग तोमर आणि एल मुरूगन मंगळवारी गोव्यात येत आहेत. विधिमंडळ गटनेता हाच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असल्याने या निवडीला विशेष महत्त्व आहे.

यापूर्वी मंत्री विश्वजित राणे, मंत्री माविन गुदिन्हो यांनी ही ज्येष्ठतेच्या आधारे या पदावर दावा केला आहे. यावर केंद्रीय निरीक्षक भाजप आमदार, भाजप कोअर कमिटी यांच्याशी सविस्तर चर्चा करतील आणि 16 मार्चला नावाची घोषणा करण्यात येईल. केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी होळीनंतरच ‘शपथविधी’ करण्यााचे सांगितल्याची माहिती आहे.

कांपाल मैदानावर 19 मार्चला शपथविधी

राज्यात भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवल्याने कार्यकर्त्यांचा जोश वाढला आहे. म्हणून शपथविधी सोहळा मैदानावर व्हावा अशी पक्ष कार्यकर्त्यांची मागणी आहे. यानुसार भाजपने हा सोहळा कांपाल मैदानावर घेण्याचे ठरवले असून त्यासाठी 5 हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी माहिती भाजप नेत्याने दिली. यावेळी केंद्रातील काही नेते निवडणूक प्रभारी आणि शेजारील राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशीही शक्यता आहे. हा शपथविधी 19 किंवा 20 मार्चला होईल

विशेष निरीक्षक आज येणार

आज दिल्लीत झालेल्या केंद्रीय संसदीय समितीच्या बैठकीमध्ये गोव्याच्या विधिमंडळ नेतेपदाची निवड करण्यासाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि एल मुरुगन यांची विशेष निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. ते मंगळवारी गोव्यात पोहोचत आहेत. ते आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांशी बैठक करतील. त्यानंतर भाजपच्या सर्व विधिमंडळ सदस्यांची वन टू वन आणि नंतर संयुक्त बैठक घेऊन चर्चा करतील. हे निरीक्षक 16 मार्च रोजी विधिमंडळ नेतेपदाची निवड करतील. या निवड प्रक्रियेनंतर ते राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करतील.

‘दाम्‍पत्‍या’मुळे मंत्रिमंडळही रखडले

मंत्रिपदे व वजनदार खाती मिळावीत यासाठी मोठ्या प्रमाणात ‘लॉबिंग’ सुरू आहे. बाबूश मोन्‍सेरात यांना पत्‍नीसह मंत्रिपद हवे आहे. जेनिफर मोन्‍सेरात यांना मंत्रिमंडळातून वगळल्‍यास त्‍यांच्‍या जागी एकमेव उरलेल्‍या डॉ. दिव्‍या राणे यांना मंत्रिपद दिले जावे, यावर विश्‍‍वजीत यांच्‍यासह अनेकांची साथ आहे. कारण मंत्रिमंडळात महिला असावी, असे पक्षश्रेष्‍ठींनाही वाटते. अर्थात या ‘दाम्‍पत्‍य घोळा’मुळे मंत्रिमंडळही रखडले आहे.

प्रमोद सावंत
गोव्यात काँग्रेसच्या पक्षांतर्गत लाथाळ्यामुळे पराभव ओढवला

उत्तर प्रदेशसाठी अमित शहा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशासह 4 राज्यांत पुन्हा सत्तेवर आलेल्या भाजपक्षाने त्या त्या राज्यांतील नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी पर्यवेक्षकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तर गोव्यासाठी कृषीमंत्री नरेंद्र तोमर व एल मुरूगन हे पर्यवेक्षक (निरीक्षक) म्हणून जातील.

चारही राज्यांत पुन्हा सत्ता येऊनही गोवा व उत्तराखंडसाठी नवीन ‘कौन बनेगा मुख्यमंत्री?’ याबाबत स्पष्ट सांगण्यात येत नसल्याने संभ्रम आहे. केंद्रीय पर्यवेक्षक पियुष गोयल व संघटनमंत्री बी. एस. संतोष हेही गोव्यात जाऊन आमदार, नेत्यांशी चर्चा करतील. दरम्यान, भाजपने उत्तराखंडासाठी राजनाथसिंह व परराष्ट्र राज्यमंत्री मंत्री मीनाक्षी लेखी यांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्याचे जाहीर केले. सतपाल महाराज, अजय भट्ट आदींच्या महत्वाकांक्षी पल्लवीत झाल्या आहेत. मणिपूरसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन व कायदेमंत्री किरेन रिजीजू हे पर्यवेक्षक म्हणून जातील.

प्रमोद सावंत
'मोपा विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव द्यावे'

नेता निवड आणि मंत्रिमंडळाबाबतचे निर्णय भाजपमध्‍ये केंद्रीय संसदीय समितीचे निरीक्षक घेतात. त्‍यामुळे पक्ष सोपवील ती जबाबदारी आपण निष्‍ठेने पार पाडणार आहे. यासाठी विशेष निरीक्षक 16 मार्चला गोव्‍यात येण्‍याची शक्‍यता असून, त्‍याच दिवशी नवनिर्वाचित विधीमंडळ सदस्‍यांची बैठक होणार आहे. या बैठकीत नेता निवडण्‍याची प्रक्रिया पूर्ण करण्‍यात येईल. - डॉ.

प्रमोद सावंत, काळजीवाहू मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com