IIT Goa Placement
IIT Goa Placement  Dainik Gomantak
गोवा

मंदीत संधी! IIT Goa च्या 90 टक्केपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची बाजी; Google, Siemens, Accenture सारख्या कंपनीत प्लेसमेंट

गोमन्तक डिजिटल टीम

IIT Goa: आयआयटी गोवाच्या 90 टक्केपक्षा अधिक विद्यार्थ्यांची यशस्वी प्लेसमेंट झाली असून, अजूनही प्लेसमेंट प्रक्रिया सुरु आहे. यावर्षीची प्लेसमेंट टक्केवारी 95 च्या पुढे जाण्याची अपेक्षा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यावर्षी जुलैमध्ये होणाऱ्या दीक्षांत समारंभात 138 विद्यार्थ्यांना बीटेक आणि 21 विद्यार्थ्यांना एमटेक पदवी बहाल करण्यात येईल. याच समारंभात आठ विद्यार्थ्यांना पीएचडी प्रदान करण्यात येणार आहे.

संस्थेने त्यांच्या अधिकृत निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, संस्थेच्या 90 टक्केपेक्षा अधिक BTech आणि MTech पदवीधर विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नोंदणी केली होती.

एकूण 161 कंपन्यांनी प्लेसमेंट प्रक्रियेत सहभाग घेतला. सॉफ्टवेअर इंजिनियरिंग , प्रॉडक्शन मॅनेजमेंट, R&D आणि इतर क्षेत्रांमध्ये कंपन्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना नोकऱ्या देऊ केल्या आहेत.

Adobe, Discovery, GE Vernova, ARM, Siemens, MathWorks आणि Google या कंपन्यांचा टॉप रिक्रूटर कंपनीजमध्ये समावेश होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, सहा विद्यार्थ्यांना जपान मधल्या Accenture आणि Willings सारख्या कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय ऑफर मिळल्या आहेत.

जागतिक मंदीचे सावट असताना देखील आयआयटी (IIT) -गोवाने कामगिरीत सातत्य ठेवले आहे, असे आयआयटी-गोवाने सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी प्लेसमेंट दर 97.6 टक्के होता, आणि शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी, तो 97.9 टक्के होता.

जुलै 2016 मध्ये फर्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय संकुलाच्या परिसरात IIT-गोवा सुरु झाले. जागेची अडचण असूनही, संस्थेने एमटेक आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम सुरु करण्यात केले.

राज्य सरकारने आयआयटीच्या कायमस्वरूपी कॅम्पससाठी रिवण, सांगे येथील मालेवाडा येथे 10.5 लाख चौरस मीटरचा भूखंड निश्चित केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देखील त्याला मंजुरी दिली आहे. सध्या जमिनीच्या मालकीबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT