Covid-19 Goa  Dainik Gomantak
गोवा

Covid-19 Goa: 90 नवे रुग्ण; रोगप्रतिकारतेसाठी कोविशिल्ड उपयुक्त

कोविशिल्ड लसीमुळे जीवनभर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होते. तसेच आता गोव्यातील विदेशींना लसीकरणासाठी दिशानिर्देशांची प्रतीक्षा आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात सोमवारी चार कोरोनाबाधितांचे निधन झाले. यातील दोघांवर गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे व एकावर दक्षिण गोवा खाजगी इस्पितळात उपचार चालू होते. तर एका कोरोनाबाधिताचे निधन पेडणे आरोग्य केंद्रात झाले. कोविशिल्ड लसीमुळे जीवनभर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होते. तसेच आता विदेशींना लसीकरणासाठी दिशानिर्देशांची प्रतीक्षा आहे, असे प्रतिपादन राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी केले. (90 new corona patients registered in Goa)

विदेशींना लसीकरणासाठी दिशानिर्देशांची प्रतीक्षा

चिखळी येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित अतिसार नियंत्रण कार्यक्रमानंतर डॉ. बोरकर पत्रकारांशी बोलत होते. बोरकर यांनी सांगितले की, सुमारे दहा लाख लोकांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे त्यांना 60 टक्के सुरक्षितता प्राप्त झाली आहे. तसेच साधारण अडीच लाख लोकांनी कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यामध्ये 80 टक्के सुरक्षितता आली आहे. राज्यातील 18 वर्षांवरील सुमारे 11,94, 329 लोकांनी म्हणजे 83 टक्के लोकांनी लस घेतली आहे. लोकांनी स्वतः पुढे येऊन लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्य सरकारने सर्व स्तरातील लोकांना लसीकरणाची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये गर्भवती महिला, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आणि नेपाळी नागरिकांचा समावेश आहे.तिसरी लाट आल्यास हे लसीकरण अंत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3,136 झाली आहे. सोमवारी 3,541 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातून 90 नवे कोरोनाबाधित आढळून आले. 107 जण बरे झाले. राज्यात आत्तापर्यंत 1,70,581 लोक कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील 1,66,308 बरे झाले. कोरोनाबाधित बरे होण्याची टक्केवारी 97.50 अशी आहे. 4 कोरोना बळी, 90 नवे रुग्ण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT