Goa Vaccination: पहिल्या डोसचे लक्ष्य 31 जुलैपर्यंत अशक्यच

कोरोनाबाधितांना उपचारानंतर 3 महिने लस (Goa Vaccination) घेण्याची अनुमती नाही. केंद्राकडून 18,73,300 डोस
Goa Vaccination
Goa VaccinationDainik Gomantak

पणजी: गोवा (Goa Government) सरकारने 31 जुलैपर्यंत राज्यातील 18 वर्षांवरील 11 लाख 94 हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस (first dose of vaccine) देण्याचे लक्ष्य ठेवले. मात्र कोरोनाबाधितांना उपचारानंतर 3 महिने लस (Goa Vaccination) घेण्याची अनुमती नसल्यामुळे हे लक्ष्य 31 जुलैपर्यंत पार करणे अशक्य आहे. (It is impossible for Goa government to meet target of first dose of vaccine by July 31)

राज्याच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियानाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी गोव्यात 55 हजार नागरिक कोरोनाबाधित झाले. मात्र दुसऱ्या लाटेवेळी 1 लाख 15 हजारांच्या आसपास लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. पहिल्यांदा दोन लसीमधील तसेच बाधितांनी बरे झाल्यानंतर लस घेण्याचा कालावधी 28 दिवस होता. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने हा कालावधी 90 दिवसांचा केला. त्यामुळे ज्यांना कोरोना होऊन 90 दिवस झालेले नाहीत असे दुसऱ्या लाटेवेळी बाधित झालेले सुमारे लाखभर नागरिक 90 दिवस पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Goa Vaccination
Big Debate: गोवेकरच ठरवणार कुणाचा उडाला फ्यूज..!
Goa Vaccination
Goa VaccinationDainik Gomantak

गोव्यात 85 % लोकांना लसीचा पहिला डोस दिलेला असून छोट्या राज्यासाठी ही टक्केवारी चांगली आहे. देशात ज्या राज्यांची लोकसंख्या मोठी आहे त्यांची आणि लहान राज्यांची तुलना होऊ शकत नाही.

"राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुमारे 80 च्या आसपास केंद्रे आहेत. त्यात आणखी वाढ करण्याची गरज नाही. ज्या लोकांनी लस घेतली नाही, त्यांनी अफवावर विश्‍वास न ठेवता लस घेण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आरोग्य खाते शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहे."

- डॉ. जुझे डिसा, आरोग्य संचालक

Goa Vaccination
Goa Vaccination: पंधरा दिवसांत 2,18,955 जणांना दिली लस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com