Goa dairy  Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy: गोवा डेअरीचे 9 संचालक अपात्र; सहकार निबंधकांची कारवाई

6 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सुरू होती चौकशी

Akshay Nirmale

Goa Dairy: गोवा डेअरीच्या 9 संचालकांना अपात्र ठरविण्यात आले आहे. सहकार निबंधकांनी ही कारवाई केली आहे. 6 कोटी रूपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी सुरू होती. त्यानंतर ही कारवाई झाली आहे.

दरम्यान, गोवा डेअरीला तत्कालीन संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या सदोष निर्णयामुळे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानतंर सहकार निबंधकाकडून 18 संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहकारी संस्थांच्या निबंधकांनी 17 फेब्रुवारी रोजी कथित गोवा डेअरी घोटाळा प्रकरणी सहकारी संस्था निबंधक, पाटो-पणजी येथील कार्यालयात सुनावणी झाली होती.

गोवा डेअरी कथित घोटाळ्याची चौकशी करण्यास सहकारी संस्थांचे निबंधक दिरंगाई करत आहेत, असा आरोप तक्रारदारांनी करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने सहकारी संस्थांच्या निबंधकांना तीन महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

पशुखाद्य निर्मिती केंद्रात दर्जाहीन साहित्य वापरण्यात आल्याचे, म्हशीचे दूध शेजारील राज्यातून अधिक दराने खरेदी करण्यात आल्याचे तसेच आईस्क्रीम प्लांटसाठी कमी दर्जाचे मशिन खरेदी करण्यात आल्याचे आरोप झाले होते.

सहाय्यक निबंधकांनी केलेल्या चौकशी अहवालातूनही ते समोर आले होते. याचा फटका गोवा डेअरीला बसला असून यात एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT