Cashew Feni Goa|Canacona Dainik Gomantak
गोवा

Cashew Feni Goa: काणकोणात काजू फेणी गाळपाचे 89 विभाग

काणकोण तालुक्यात गुळे ते पोळे व खोला ते खोतीगावपर्यंत काजू फेणी गाळपचे 89 विभाग आहेत.

दैनिक गोमन्तक

Cashew Feni Goa काणकोण तालुक्यात गुळे ते पोळे व खोला ते खोतीगावपर्यंत काजू फेणी गाळपचे 89 विभाग आहेत. या 89 विभागासाठी दरवर्षी अबकारी खाते पावणी काढत असते.

यंदा सात विभागांसाठी पहिल्या फेरीतील पावणी 24 रोजी मडगाव रवींद्र भवनात झाली.

त्यातून अबकारीच्या तिजोरीत 29 हजार 200 रूपये महसूल जमा झाला, अशी माहिती काणकोणचे अबकारी अधीक्षक चंद्रनाथ देसाई यांनी दिली.

जास्त बोली लावणाऱ्या बोलीदाराला ही पावणी जाते. गेल्या वर्षी या 89 विभागातून अबकारी खात्याला 2 लाख 51 हजार 800 रूपयांचा महसूल मिळाला होता.

प्राप्त माहितीनुसार काजू फेणीला चांगली बाजारपेठ व भाव असूनही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त काजू बोंडे बिया काढून काजू रस न गाळता फेकून देतात. पूर्वीच्या काळी काजू बोंडाचा रस मानवी बळाचा वापर‌ करून काढण्यात येत होता.

आता मळणी यंत्र उपलब्ध आहे. आजही काजू रसापासून फेणी व हुर्राक तयार करण्यासाठी पारंपरिक उर्ध्वपातन पद्धतीचा वापर केला जातो.

काजूची रोपटी अनुदान तत्त्वावर

काणकोणात 3500 हेक्टर जमीन काजू लागवडीखाली आहे. गावडोंगरी, खोतीगाव, खोला व श्रीस्थळ या पंचायत क्षेत्रातील रहिवाशांचे हे नगदी पीक आहे.

त्यासाठी दरवर्षी कृषी खात्याकडून काजूची रोपटी अनुदान तत्त्वावर वितरित करण्यात येतात, असे विभागीय कृषी अधिकारी किर्तीराज नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT