Folk Culture: गोमंतकाला वैभवशाली लोकसंस्कृतीचा वारसा

गोव्याची नाळ लोकसंस्कृतीशी जोडलेली आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांनी केले.
Ranmale Folk Art Goa
Ranmale Folk Art GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Folk Art Culture of Goa: गोव्याची प्रतिमा नेहमीच समुद्रकिनारे, पब, पार्ट्या यांच्याशी जोडली जाते. मुळात आपला गोमंतक असा नसून गोव्याला वैभवशाली लोकसंस्कृतीचा वारसा लाभलेला आहे.

गोव्याची नाळ लोकसंस्कृतीशी जोडलेली आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांनी केले.

धारगळ-पेडणे येथे समाज समता संघ गोवा आणि कला व संस्कृती संचालनालय गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फुगडी महोत्सवाच्या उद्‍घाटन कार्यक्रमावेळी पालयेकर प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, समाजसेविका सीमा परब, स्वर गणेश कला केंद्राचे अध्यक्ष व नाट्यकलाकार नारायण साळगावकर, समाज समता संघाच्या अध्यक्षा रागिनी धारगळकर आदी उपस्थित होते.

Ranmale Folk Art Goa
Fire Safety: गोव्यात आगीच्या घटनांमध्ये अनेकपटींनी वाढ कारण...

पालयेकर म्हणाले की, लोककला प्रबोधनाचे एक साधन आहे. या लोककलांचे शरीर जरी मनोरंजनाचे असले तरी आत्मा हा प्रबोधनाचा आहे. अशा या लोककलेचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे.

मनोहर धारगळकर म्हणाले की, काळाच्या ओघात लोककला लोप पावत चालल्या आहेत. विविध माध्यमातून आणि उपक्रमांतून समाजाला संस्कारित करणाऱ्या समाज समता संघाने लोकजीवन घडविणाऱ्या फुगडी महोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल संघाचे अभिनंदन!

Ranmale Folk Art Goa
Goa News: कुडचडे नगरपालिकेची 10 दुकाने, 2 थिएटर्स भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

शिव राष्ट्रोळी महिला मंडळ (धारगळ), श्री वंश राष्ट्रोळी महिला मंडळ (वझरी), श्री भूमिका आदिमाया महिला मंडळ (मांद्रे),श्री मोरेश्वर महिला मंडळ (तुळसकरवाडी नागझर), श्री सातेरी ब्राह्मणी महिला मंडळ (हसापूर),श्री वीर माऊली महिला मंडळ (धारगळ) या संघांनी फुगडी महोत्सवात सहभाग घेतला.

स्वागत व प्रास्ताविक रागिनी धारगळकर यांनी केले. सूत्रसंचालन ओंकार गोवेकर यांनी केले तर रेश्मा धारगळकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com