88 posts Primary Teachers panaji  Dainik Gomantak
गोवा

Goa Education: प्राथमिक शिक्षकांच्या 88 पदांसाठी मुलाखती

Goa Education: असे आवाहन शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी केले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Education: राज्यातील विविध तालुक्यांतील प्राथमिक शाळांमध्ये रजेवरील शिक्षकांच्या बदली कंत्राटी पद्धतीवर 88 शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी येत्या 7 ते 9 नोव्हेंबरदरम्यान घेण्यात येणाऱ्या थेट मुलाखतीसाठी शिक्षकांच्या पदासाठी डीएड पदवी उमेदवारांनीच यावे. बीएड पदवी उमेदवारांनी या पदासाठी मुलाखतीसाठी येऊ नये, असे आवाहन शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी केले आहे.

रजेवरील शिक्षकांच्या बदली कंत्राटी पद्धतीवर विविध तालुक्यांमध्ये एकूण 88 उमेदवारांच्या जागा आहेत. त्यासाठी येत्या 7 ते 9 नोव्हेंबरदरम्यान मुलाखती गोव्यातील विविध भागांत घेण्यात येणार आहेत. बार्देश व फोंडा तालुक्यातील शाळांसाठी प्रत्येकी 12 शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे.

तिसवाडी व सत्तरी तालुक्यासाठी प्रत्येकी 10, धारबांदोडा व केपे तालुक्यासाठी प्रत्येकी 8, सासष्टी तालुक्यासाठी 7, डिचोलीसाठी 6 तर पेडणे व काणकोण तालुक्यासाठी प्रत्येकी 5, सांगेसाठी 3 व मुरगाव तालुक्यासाठी 1 जागा आहे.

टीईटी उत्तीर्णना प्राधान्य

डीएड पदवी असलेल्या उमेदवारांनी आवश्‍यक प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे. ४५ वर्षांपर्यंत वय असलेल्यांनाच या जागांसाठी अर्ज करता येणार आहे. अनुभवी व शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) उत्तीर्ण झालेल्यांना प्राधान्य दिले जाईल. या पदासाठी निवड झालेल्या कंत्राटी शिक्षकांना एकत्रित वेतन 39,015 रुपये दिले जाणार आहे, असे झिंगडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT