मध्य प्रदेशातील रीवा (Rewa) येथे तीन वाहनांच्या धडकेने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 30 वर हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. अपघात झाला तेव्हा बस जबलपूरहून रिवामार्गे प्रयागराजला जात होती. माहिती मिळताच सोहागी पोलिसांनी घटनास्थळ गाठून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना टुंथर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सुहागी टेकडीजवळ बस आणि ट्रॉली यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाल्याची माहिती रेवाचे पोलीस अधीक्षक नवनीत भसीन यांनी दिली. ते म्हणाले की, 40 जखमींपैकी 20 जणांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसपीने सांगितले की बस हैदराबादहून निघाली होती आणि ती गोरखपूरला पोहोचणार होती. बसमधील (Bus) सर्व लोक यूपीचे रहिवासी असल्याची माहिती आहे.
रीवा एसपीच्या म्हणण्यानुसार, सुहागी टेकडीवरून उतरत असताना एका ट्रॉलीची समोरून जाणाऱ्या ट्रकला धडक बसली आणि त्यानंतर बस त्यावर धडकली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची नावे उत्तर प्रदेशातील बलरामपूर, गोंडा आणि गोरखपूर येथील आहेत. या अपघातात ट्रकमध्ये मजूर होते, ते जखमी झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.