Digambar Kamat  Daink Gomantak
गोवा

Digambar Kamat: मडगावकरांनी मला ‘उलटा-सुलटा’ पारखून पाहिले आहे; कामत यांचा विश्‍वास

Margao: मतदारांचा माझ्‍यावर पूर्ण विश्‍वास आहे ताेवर माझ्‍यावर टीका केली म्‍हणून मी चिंता करत नाही असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: मडगावातून मी तब्‍बल आठवेळा जिंकून आलेलो आहे. मडगावच्‍या प्रत्‍येक मतदाराला मी नावानिशी ओळखतो. मडगावच्‍या मतदारांनीही मला अगदी ‘उलटा-सुलटा’ म्‍हणतात, तसे पारखून पाहिले आहे. मतदारांचा माझ्‍यावर पूर्ण विश्‍वास आहे, तो ढळत नाही, ताेवर माझ्‍यावर कुणीही आणि कशीही टीका केली, म्‍हणून मी चिंता करत नाही, असे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.

सध्‍या माजी हाेमगार्ड विमल शिरोडकर यांच्‍या घराच्‍या दुरुस्‍तीवरून वाद निर्माण झाला आहे. ही दुरुस्‍ती श्रेय मिळणार नाही, असे वाटल्‍याने मामलेदारांना पाठवून ती अडवून ठेवली, अशी विरोधकांनी कामतांवर टीका केल्‍यामुळे सध्‍या मडगावात हा चर्चेचा विषय आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या लोकप्रिय कार्यक्रमात कामत बोलत होते. ‘गोमन्‍तक’चे ब्‍युराे चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली असून ‘गोमन्‍तक टीव्‍ही’.च्‍या यू-ट्यूब, फेसबुक आणि इन्‍स्‍टाग्रामवर ती उपलब्‍ध आहे.

कामत म्‍हणाले, मी दुरुस्‍ती अडवली, असे जे माझ्‍यावर आरोप करतात, त्‍यांनी प्रत्‍यक्षात शिरोडकर ज्‍या भाटकाराच्‍या घरात रहाते त्‍यांच्‍याशी साटेलोटे करुन तिला पत्र्याचे तकलादू घर बांधून देण्‍याचे ठरविले होते. मात्र हे घर पक्‍के चिऱ्यांच्‍या भिंतीचे असावे, असे माझे मत होते.

त्‍यामुळे पत्र्याचे घर बांधण्‍यास माझा विरोध होता. सर्वांत आधी तिथे आमचे नगरसेवक महेश आमोणकर पोचले. त्‍यानंतर मी. त्‍यानंतर तिथे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस हेही आले. त्‍यांना तिथे कुणी आणले, माहीत नाही. पण शिरोडकर हिला कुणी मदत करत असेल, तर मला त्‍याचा आनंदच होईल.

मडगाव कोसळू लागलेय, अशी टीका विजय सरदेसाई यांनी केली होती. यावर कामत म्‍हणाले, आरोप करणाऱ्यांनी डोळसपणे पहावे. मडगावात रेल्‍वे ओव्‍हरब्रिज, सुसज्‍ज असे रवींद्र भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय, चार मजली जिल्‍हा इस्‍पितळ हे सर्व प्रकल्‍प मी आमदार आणि मुख्‍यमंत्री असताना झालेत. आताही नवीन प्रकल्‍प उभे रहाताहेत, त्‍यात सहापदरी रेल्‍वे ओव्‍हरब्रिजसह बहुमजली पार्किंग प्रकल्‍पही आहे. पालिका परिसराचे सौंदर्यीकरणासाठीही येत्‍या १५ दिवसांत निविदा जारी होईल. हा विकास नव्‍हे का? असा सवाल कामत यांनी केला.

...त्यामुळे तरी तोंडी देवाचे नाव!

दिगंबर कामत हे देवाशी बोलतात, अशी टीका विरोधक करतात. विशेषत: विजय सरदेसाई हा मुद्दा वारंवार उपस्‍थित करून कामत यांची खिल्‍ली उडवतात. याबद्दल कामत यांना विचारले असता, त्‍यांना माझी खिल्‍ली उडवायची असेल तर त्‍यांना ती खुशाल उडवू दे. निदान यामुळे तरी त्‍यांच्‍या तोंडी देवाचे नाव येते, हे खूप झाले असे ते म्‍हणाले.

योगिराजचा निर्णय मडगावकरांच्या मर्जीवर

२०२७ ची निवडणूक मडगावकरांच्‍या मर्जीवर २०२७ ची विधानसभा निवडणूक तुम्‍ही स्‍वत: लढणार की पुत्र योगिराज, असा प्रश्‍न विचारला असता, कामत म्हणाले, हे सर्व मडगावकरांच्‍या मर्जीवर अवलंबून आहे. २०२७ मध्‍ये मडगावकरांना हवे असल्‍यास स्‍वत: निवडणूक लढवेन. याेगिराज राजकारणात उतरणार की नाही, याची सध्‍या तरी मला कल्‍पना नाही. त्‍याने अजून मला तसे सांगितलेले नाही. सध्‍या तो फक्‍त कामात मदत करतो. त्‍याला राजकारणात रुची आहे की नाही, यावरच पुढचा निर्णय ठरू शकतो. सध्‍या तरी त्‍याला मी राजकीयदृष्‍ट्या ‘प्रमोट’ करतो या आराेपात तथ्‍य नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT