Congress MLA Joined BJP
Congress MLA Joined BJP Dainik Gomantak
गोवा

Congress MLA Joined BJP : गोव्यात काँग्रेसचे आठ आमदार 'भाजपवासी'

गोमन्तक डिजिटल टीम

Congress MLA Joined BJP : गोव्यात अगदी सकाळपासूनच सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. काँग्रेसच्या 8 आमदारांच्या गटाने भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी याची औपचारिक घोषणा केली आहे. यासोबतच भाजपच्या पक्ष कार्यालयात आठही आमदारांचं स्वागत करण्यात आलं आहे.

काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे गोव्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. दिगंबर कामत यांनी सलग आठवेळा मडगावमधून विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता कामत भाजपमध्ये आल्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्लाही भाजपच्या ताब्यात आला असल्याचं तानावडेंनी जाहीर केलं आहे. त्यामुळे गोव्यात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी झालं आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळाला आम्ही कंटाळलो होतो. त्या पक्षात आपल्याच नेत्यांचे पाय खेचण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं मायकल लोबो यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच आपल्या भाजप प्रवेशामुळे संपूर्ण बार्देश तालुक्यात आनंदाचं वातावरण असल्याचंही लोबो म्हणाले आहेत.

विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात काँग्रेस आमदारांनी चर्चा केली. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेस आमदारांच्या गटामध्ये माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यासह अन्य 7 आमदारांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने मायकल लोबो, डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि रुडॉल्फ फर्नांडिस या काँग्रेसच्या आमदारांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahadev Betting App Case: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Taleigao VP Election: 'पणजी कधीच सोडणार नाही', बाबूश यांचा विजयानंतर इशारा

Goa Today's Live News Update: धारगळ येथे उच्चदाब वीजवाहिनीला धक्का, सहा वीजखांब कोसळले

Russian In Goa: मद्यधुंद रशियन जोडप्याचा शिवोलीत राडा; पोलिसांसोबत हुज्जत, 108 ची मदत नाकारली

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

SCROLL FOR NEXT