CM Pramod Sawant : गोव्याचे विद्यार्थी मागे का पडतात? मुख्यमंत्र्यांचे शिक्षकांना खडे बोल

शिक्षकांनी अद्ययावत असणे गरजेचे असून इतर बाबींवर लक्ष देण्यापेक्षा शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी, ता.१३ (खास प्रतिनिधी) ः आजचे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे शिक्षकांनी अद्ययावत असणे गरजेचे असून इतर बाबींवर लक्ष देण्यापेक्षा शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. यासाठी त्यांनी चोवीस तास सक्रिय राहावे, असे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत म्हणाले. पणजी येथे ते राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. शिक्षण संचालनालयातर्फे साजरा केला जाणारा 61 वा शिक्षक दिन इन्स्टिट्यूट मिनेजेस ब्रागांझामध्ये संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री सावंत उपस्थित होते.

यावेळी शिक्षण सचिव रवी धवन, संचालक शैलेश झिंगडे उपस्थित होते. राष्ट्रीय पातळीवर शिक्षण क्षेत्राचा घसरलेला राज्याचा दर्जा आणि विद्यार्थ्यांची खालावलेली गुणवत्ता यामुळे मुख्यमंत्री शिक्षणमंत्री या नात्याने त्रस्त आहेत, त्याचे पडसाद आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर पडला. देशात सर्वोत्कृष्ट साधन सुविधा आणि वेतन देणारे राज्य असून सुद्धा आपले विद्यार्थी मागे का? याचे आत्मपरिक्षण करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘अनेक शिक्षक शिक्षणाकडे दुर्लक्ष करून इतर व्यवसायही करतात. त्याचा शिक्षणावर परिणाम होतो. त्यामुळे शिक्षकांनी 24 तास शिक्षणावर लक्ष देणे गरजेचे आहे,’ अशा कानपिचक्या देत मुख्यमंत्र्यांनी शिक्षण क्षेत्रावर आणि शिक्षकांच्या कामगिरीवर बोट ठेवले.

CM Pramod Sawant
IIT Goa Protest : सांगेत सरकारची दडपशाही; आंदोलक शेतकऱ्यांवर पलटवार

नवे धोरण लागू

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली आहे. कोरोनाच्या काळात शिक्षकांनी घेतलेले कष्ट उल्लेखनीय आहेतच. मात्र, घसरलेला दर्जा सुधारण्यासाठी यापुढे विशेष प्रयत्नांची गरज आहे. शाळांमध्ये सुरू केलेले कोडिंग आणि रोबोटिक्सचे वर्गही महत्त्वाचे असून त्याकडेही शिक्षकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Man ChatGPT Viral Video
Goa CM Pramod Sawant accident help
Bori culvert railing damage
Hoysala Dynasty Garuda Lenka Warriors
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com