St. Xavier Exposition Old Goa Dainik Gomantak
गोवा

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला 8 दशलक्ष लोकं हजेरी लावण्याची शक्यता; गोव्यात होणार 45 दिवसांचा भावदीव्य सोहळा

Old Goa Exposition Ceremony Update: या वर्षीच्या प्रदर्शनाची सुरुवात दिल्लीचे आर्चबिशप यांच्या नेतृत्वाखालील बॅसिलिका येथे सकाळच्या मासने होईल

Akshata Chhatre

ओल्ड गोवा: गेल्या अनेक दिवसांपासून गोवेकर तसेच इतर भाविकांच्या मनात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शन सोहळ्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे आणि गुरुवार (दि. २१ नोव्हेंबर) पासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. हा आंतरराष्ट्रीय स्थरावरील महत्वाचा सोहळा असल्याने फक्त देशातूनच नाही तर विदेशातून देखील अनेक भाविक दरम्यान ओल्ड गोव्याला येणार आहेत.

पोर्तुगीजांच्या काळात ओल्ड गोवा ही त्यांची राजधानी होती आणि सेंट झाव्हियर यांचा मृत्यू झाल्यानंतर 1782 पासून गोव्यात शव प्रदर्शनाला सुरुवात झाली. या वर्षीच्या प्रदर्शनाची सुरुवात दिल्लीचे आर्चबिशप अनिल कौटो यांच्या नेतृत्वाखालील बॅसिलिका येथे सकाळच्या मासने होईल आणि त्यानंतर इतर दहा बिशप यामध्ये सामील होणार आहेत. दरम्यान गोव्याला विविध धर्मातील सुमारे 10,000 लोक सामील होतील अशी शक्यता वर्तवली जातेय.

एकाच इंग्रजी माध्यमानाला मिळालेल्या माहितीनुसार चांदीच्या डब्यात ठेवलेले सेंट झेवियर यांचे शव काही लोकांच्या मदतीने 50 मीटर अंतरावर असलेल्या से कॅथेड्रलमध्ये आणण्यात येतील आणि इथून पुढे हे शव इलेक्ट्रिक कॅरेजमध्ये ठेवण्यात येणार आहे.

21 नोव्हेंबर रोजी सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शव जेसुइट पुजारी आणि सामान्य लोकांद्वारे बॅसिलिका प्रवेशद्वाराकडे हलविले जाईल आणि त्यानंतर काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने भाविकांसोबत एक भव्य मिरवणूक निघेल आणि यानंतर सेंट झेवियर यांचे शव प्रदर्शनासाठी ठेवले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT