Goa Congress MLA Dainik Gomantak
गोवा

Congress MLA: बंडखोर निघाले दिल्लीश्वराच्या दर्शनाला

दिल्ली दौऱ्यावरुनंतर होणार मंत्रीमंडळ विस्ताराचा फैसला

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेसचे 8 बंडखोर नेते भाजपात स्थिरावले आहेत. आज ते दिल्लीला निघाले असून हायकमांडशी चर्चा करुन परल्यानंतर गोवा मंत्रीमंडळातील खांदेपालट होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली दौऱ्याबाबत नुकतीच माहिती दिली आहे.

(8 Goa Congress MLAs will meet Prime Minister Narendra Modi in Delhi)

काँग्रेसमधून भाजपात आलेले दिगंबर कामत, मायकल लोबो, केदार नाईक, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, रुडाल्फ फर्नांडिस, दिलायला लोबो आणि आलेक्स सिक्वेरा या आठजणांसह ते स्वतः आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आज दिल्लीला निघाले आहोत. उद्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

लोबो घाईघाईने दिल्लीकडे

कळंगुटचे आमदार मायकल लोबो आपल्या मित्राच्या लग्नासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले आहेत ते आज रात्री परस्पर दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या विमानाला विलंब झाला किंवा नियोजन बदलले, तर मोदींची एकत्रित भेट मिळणार नाही. त्यामुळे ते घाईघाईने दिल्लीकडे निघाल्याची माहिती आहे. भाजपात दाखल होण्याची सर्वाधिक आतुरता लोबो यांनाच लागली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी ही दिल्ली भेट महत्त्वाची आहे.

पदांबाबत भेटीनंतर स्पष्टता

पहिल्यांदाच होत असलेली फुटीर बंडखोरांची दिल्ली भेट महत्त्वाची असून या भेटीनंतरच त्यांना कोणती पदे मिळणार याबाबतची स्पष्टता होणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही यापूर्वी दिल्ली भेटीनंतर ‘त्यांना’ मंत्रिमंडळात घ्यायचे की नाही याशिवाय त्यांना कोणती पदे द्यायची हे ठरणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांची उद्या सोमवारी होणारी दिल्ली भेट महत्त्वाची असून या भेटीमध्ये गोव्यातील हे नेते राष्ट्रीय नेत्यांची भेट घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT