Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: खराब हवामानाचा फटका; दाबोळीवर सकाळी उतरणारी आठ विमाने इतरत्र वळवली, अखेर

या आठ विमानांमध्ये मुंबई, दिल्ली, मस्कतसह विविध विमानांचा समावेश होता.

Pramod Yadav

बुधवारी सकाळी दाबोळी विमानतळावर उतरणार असलेली आठ विमाने विमानतळ परिसरात खराब हवामानामुळे (कमी दृश्यमानता) भारतातील इतर विमानतळांवर वळवावी लागली. या आठ विमानांमध्ये मुंबई, दिल्ली, मस्कतसह विविध विमानांचा समावेश होता.

मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे बुधवारी सकाळी दाबोळी विमानतळावर उतरणार असलेली आठ विमाने वळविण्यात आली. यात मस्कतहून आलेल्या एका आंतरराष्ट्रीय विमानाचा समावेश होता. तसेच, मुंबईहून येणारी दोन, बेंगळुरूची दोन, दिल्लीचे एक, हैदराबादचे एक, कोचीनच्या एका विमानाचा समावेश होता. ही विमाने मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादच्या विमानतळांवर वळवावी लागली.

हवामान परिस्थिती सामान्य झाल्यानंतर (स्पष्ट दृश्यमानता) विमाने दाबोळी विमानतळावर उतरली. सुमारे दोन ते अडीच तास उशिराने विमानतळावर विमाने उतराविण्यात आले.

कोणती विमाने वळविण्यात आली.

G8-0575, AI-685, I5-818, 6E-743, WY-277, 6E-211, 6E-194, and I5-779

मुंबई, बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, कोचीन आणि मस्कत येथून येणार होत्या. अखे अडीच तासांच्या विलंबानंतर ही विमाने दाबोळी उतरविण्यात आली आहेत. एअर आशिया, गो फर्स्ट, ओमान एअर, इंडिगो यांच्या या फ्लाईट्स होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT