Crime News: कोल्हापुरात चोऱ्या करून सोने विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून 14 घरफोड्या उघडकीस आल्या आहेत.
या चोरट्यांनी कोल्हापूरसह महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात त्यांनी चोऱ्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांकडून याप्रकरणात तीन जणांना अटक केली आहे.
राजू सल्वराज तंगराज (वय 37, रा. कारगल, ता. सागरा, जि. शिमोगा, कर्नाटक) आणि भीमगोंडा मारुती पाटील (वय 29, रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
या कारवाईत लक्ष्मीपुरी कोल्हापूर दुसऱ्या गुन्ह्यातील एकालाही पोलिसांनी अटक केली आहे. संशयित बेळगावात कारगृहात शिक्षा भोगत असताना नवी टोळी तयार करत प्लॅन तयार केले असल्याचं स्पष्ट झालं आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील घरफोड्या उघडकीस आल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे. त्यांच्याकडून सुमारे 24 लाख 32 हजार 646 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घरफोडी सारख्या गुन्ह्यात समावेश असलेल्या दोन संशयितांवर कारवाई केली. संशयित कोल्हापुरात चोऱ्या करून सोने विक्री करत असत, ही आंतरराज्य चोरट्यांच्या टोळी असून कोल्हापूर पोलिसांनी याचा पर्दाफाश केला आहे.
कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कोल्हापुरमध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. त्या गुन्ह्यांचा शोध घेताना एका आंतरराज्यीय टोळीने घरफोड्या केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.
विनायक चौगुले यांनी अधिक माहिती घेऊन 10 फेब्रुवारीला चित्रनगरीजवळ राजू तंगराज आणि भीमगोंडा पाटील यांना पकडले. अधिक चौकशीत त्यांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली. या टोळीतील आणखी दोघांचा शोध सुरू असून, अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. असे पोलिसांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.