Goa Post Office
Goa Post Office Dainik Gomantak
गोवा

Pondaतील 7 पोस्टमनचा विषय तापला; पोस्ट कार्यालयावर धडक!

दैनिक गोमन्तक

Ponda Post Office: कार्यालयात गेली पाच ते अठरा वर्षे नोकरी केलेल्या सात पोस्टमनना तडकाफडकी कामावरून काढून टाकल्याचा प्रश्‍‍न सध्‍या तापू लागला आहे. याविरोधात फोंडावासीय एकवटले आहेत. त्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबरच कामगार नेते तसेच सामाजिक कार्यकर्तेही सामील झाले आहेत.

काल गुरुवारी काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर, कामगार नेते ह्रदयनाथ शिरोडकर तसेच सामाजिक कार्यकर्ते विराज सप्रे, कुर्टी-खांडेपारचे माजी सरपंच शैलेश शेट व इतरांनी पोस्ट कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र संबंधित माणूस समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.

फोंड्यातील सात पोस्टमनना तडकाफडकी काढून टाकल्याने त्यांच्या रोजीरोटीचा सवाल निर्माण झाला आहे. एवढी वर्षे पोस्टमन म्हणून काम केल्यावर अचानकपणे त्यांच्या हातावर नारळ ठेवण्यात आल्याने आता करायचे काय, हा प्रश्‍न त्‍यांना सतावत आहे. या गोमंतकीय पोस्टमनच्या जागी महाराष्ट्रातील पोस्टमनची भरती करण्यात आल्याने हा आमच्यावर अन्याय असल्याची भावना या सातही पोस्टमननी केली आहे.

खासदारांनी विशेष लक्ष घालावे-

पोस्ट कार्यालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने गोवा सरकारच्या तिन्ही खासदारांनी या सात पोस्टमनना दिलासा द्यावा अशी मागणी विराज सप्रे व इतरांनी केली. उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन तसेच राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर अशी गोव्‍यात तीन खासदारांची फौज असताना पोस्टमनना न्यायासाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे या तिन्ही खासदारांनी या सातही पोस्टमनना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राजेश वेरेकर व ह्रदयनाथ शिरोडकर यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

SCROLL FOR NEXT