Sanquelim Municipal Council Election Dainik Gomantak
गोवा

Ponda - Sanquelim Municipal Council Election 2023: 30 जणांची माघार, 74 उमेदवार रिंगणात; भाजपची यशस्वी रणनीती

समर्थक खान, दळवी, पुनाळेकरांसह विरोधी ब्लेगन यांची बिनविरोध निवड

दैनिक गोमन्तक डिजिटल

Ponda - Sanquelim Municipal Council Election 2023: प्रतिष्ठेच्या बनलेल्या साखळी आणि फोंडा पालिकेच्या निवडणुकीत आज माघार घेण्याच्या दिवशी 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

यात साखळीतील 23, तर फोंडा येथील 7 उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे आता एकूण ७४ उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

साखळीत काँग्रेस गटाचे प्रवीण ब्लेगन, तर भाजप गटाचे रियाझ खान बिनविरोध निवडून आले, तर फोंडा येथे भाजप समर्थक विश्वनाथ दळवी आणि मगोपमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या विद्या पुनाळेकर या बिनविरोध निवडून आल्या.

साखळीत आता 10 प्रभागांसाठी 31 उमेदवार रिंगणात उतरले आहेत, तर फोंडा येथे 13 जागांसाठी 43 उमेदवार नशीब आजमावत आहेत. एकूण राजकीय वातावरण पाहता पालिका निवडणुकीमध्ये सुरुवातीलाच भाजपची रणनीती यशस्वी झाली, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

लक्षवेधी घटना

  1. भाजपने निवडून आणले तीन समर्थक बिनविरोध

  2. बहुमतासाठीचा मार्ग सुकर करण्याचे प्रयत्न

  3. विश्‍वनाथ दळवी यांनी साधली हॅटट्रिक

  4. मगोपच्या समर्थक विद्या पुनाळेकर भाजपमध्ये दाखल

  5. पुनाळेकर यांनी विश्‍वासघात केला : केतन भाटीकर

  6. कॉंग्रेस नेते प्रवीण ब्लेगन बिनविरोध : भाजपला धक्का

  7. ब्लेगन यांची कन्या भाग्यश्री निवडणुकीच्या रिंगणात

  8. भाजपमध्ये दाखल झालेले रियाझ खान बिनविरोध

साखळीत 23, फोंड्यात 7 जण रिंगणाबाहेर

निवडणूक निरीक्षक जाहीर

आयोगाने निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा केली असून साखळी पालिकेसाठी उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, तर साहाय्यक म्हणून मामलेदार राजाराम परब काम पाहतील. सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून प्रसाद वळवईकर तर खर्च निरीक्षक म्हणून झिप्रो गावस यांची निवड केली.

फोंडा पालिकेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी रघुराज फळदेसाई, साहाय्यक म्हणून विनोद दलाल तर निरीक्षक म्हणून विशाल कुंडईकर आणि खर्च निरीक्षक म्हणून सीताराम गावडे काम पाहतील.

माजी 3 नगराध्यक्ष आखाड्यात

साखळीत मावळत्या पालिका मंडळातील ज्योती ब्लेगन, शुभदा सावईकर, अंसिरा खान, राया पार्सेकर आणि राजेश सावळ हे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत. मात्र, धर्मेश सगलानी, यशवंत माडकर आणि सुनीता वेरेकर हे तीन माजी नगराध्यक्ष या निवडणुकीत भवितव्य आजमावत आहेत.

निवडणूक चिन्हांचे वाटप

साखळीत प्रभाग 9 मधून निवडणूक लढविणाऱ्या भाग्यश्री ब्लेगन या सर्वांत तरुण उमेदवार आहेत. माजी नगराध्यक्ष यशवंत माडकर आणि माजी उपनगराध्यक्ष कुंदा माडकर या प्रभाग एकमधून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग 3, 9, 10 आणि 11 मध्ये थेट दोन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. आज उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

पुनाळेकरांची सरशी

2013 मध्ये फोंड्यात पुनाळेकर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. मात्र, 2018 सालच्या निवडणुकीवेळी विद्या पुनाळेकर यांचा प्रभाग राखीव झाल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नव्हता. त्यावेळी अमिना नाईक निवडून आल्या होत्या.

यंदा पुन्हा प्रभाग 13 मधून पुनाळेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांच्या विरोधातील दर्शना नाईक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पुनाळेकर बिनविरोध ठरल्या.

दर्शना नि:शब्द...

प्रभाग 13 मधून भाजप पॅनेलतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजप समर्थक उमेदवार दर्शना नाईक यांनी अचानक आपला अर्ज मागे घेतला आणि विद्या पुनाळेकर यांना संधी दिली. यावेळी दर्शना नाईक भावनाविवश झाल्या. त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना.

नाईक यांनी भाजप पॅनेलतर्फे उमेदवारी दाखल करूनही मगोप समर्थक उमेदवाराला संधी दिल्याने उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

फोंड्यात मित्रपक्ष ‘मगोप’ला धक्का...

विद्या पुनाळेकर या मगोपच्या खंद्या कार्यकर्त्या आहेत. मगोपचे नेते केतन भाटीकर यांच्या समर्थक म्हणूनही त्यांची ओळख आहे. मात्र, उमेदवारी दाखल करताना मगोप समर्थक म्हणूनच ओळख दाखवलेल्या विद्या पुनाळेकर यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला.

पुनाळेकर यांच्या भाजप प्रवेशामुळे मगोपला जबर धक्का बसला आहे. मात्र, मगोप नेत्यांनी याविषयी अद्याप काहीही भाष्य केलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

Rohit Sharma Record: मास्टर-ब्लास्टरचा मोडला मोठा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज; वनडे क्रमवारीत 'हिटमॅन'चे राज्य

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'फर्स्ट क्लास' ऑरा; 'जेलर 2' च्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द! पुन्हा एकदा पाऊस ठरला व्हिलन; फॉर्ममध्ये परतला कर्णधार 'सूर्या'

SCROLL FOR NEXT