Goa Congress : पाणीटंचाईवरुन PWD अभियंत्यांना काँग्रेसचा घेराव; आंदोलनाचा इशारा

मुख्य अभियंत्यांनी पाण्याची समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन
Goa Congress gherao PWD officials
Goa Congress gherao PWD officials Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress : राज्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नावरुन काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पणजी आल्तिनो येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना घेराव घालून जाब विचारला. पाण्याची समस्या न सोडविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी काँग्रेसच्या सदस्यांनी दिला.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी इतर नेत्यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील निवेदन अभियंत्यांना दिले. यावेळी मुख्य अभियंता संतोष म्हापणे यांनी पाण्याची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

Goa Congress gherao PWD officials
Goa Corona Update : राज्यात गेल्या 24 तासात 88 नवे कोरोनारूग्ण; जाणून घ्या सक्रीय रूग्णसंख्या...

अमित पाटकर यांनी पाणीप्रश्नावरुन भाजप सरकारवर टीका केली. पाटकर म्हणाले, भाजप सरकार गोव्यातील कोणतीही परिस्थिती हाताळण्यात नेहमीच अपयशी ठरले आहे. कोविडच्या काळात भाजप सरकार ऑक्सिजन पुरवण्यात अपयशी ठरल्याने लोकांचा बळी घेतला. आज परिस्थिती अशी आहे की, पाणीटंचाईमुळे लोक त्रस्त आहेत, परंतु सरकार या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काहीच करत नाही,” असे पाटकर म्हणाले.

ते म्हणाले की, संपूर्ण गोव्यात पाण्याची टंचाई आहे, 80 एमएलडी पाण्याची कमतरता असल्याचे अधिकारी सांगत आहेत. तिलारी धरण हे सिंचनासाठी बांधण्यात आले होते, परंतु आज ते पाणी मोपा विमानतळाला पुरवले जाते. पाणीपुरवठ्याचे नियोजन नाही, पाण्याच्या मीटरचीही तपासणीही नाही. सरकार गरीब जनतेला लूटत आहे, असे पाटकर म्हणाले.

Goa Congress gherao PWD officials
Sanquelim Municipal Council Election : किती अर्ज मागे, किती उमेदवार रिंगणात? असे आहे साखळी पालिका निवडणूकीचे चित्र

अमरनाथ पणजीकर म्हणाले की, "गोव्यातील अनेक गावे आणि शहरांमध्ये भेडसावणाऱ्या पाण्याच्या टंचाईमुळे भाजप सरकारची अकार्यक्षमता आणि इच्छाशक्तीचा अभाव समोर आला आहे."

"प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ‘हर घर जल’ प्रमाणित झालेले पहिले राज्य बनल्याबद्दल गोवा सरकारचे अभिनंदन केले होते. याचा अर्थ गोव्यातील प्रत्येक घराला पाईपने पाणी जोडण्यात आले. पण पाणीच नसले तर अशा कनेक्शनचा उपयोग काय, असा सवाल पणजीकर यांनी केला.

“लोकांना त्रास होत असल्याने आम्ही हा मुद्दा मांडलेला आहे, पण सरकार याकडे लक्ष देत नाही. 24 तास पाणी देण्याचे विसरून जा, पण किमान 4 ते 5 तास लोकांना पाणी मिळायला पाहिजे,” अशी मागणी पणजीकर यांनी केली.

यावेळी काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, तुलिओ डिसूझा, व्हिरियटो फर्नांडिस, बीना नाईक, वीरेंद्र शिरोडकर, साव्हियो डिसिल्वा, एव्हरसन वालेस, राजेंद्र कोरगावकर, अॅड. श्रीनिवास खलप, रामकृष्ण जल्मी, विवेक डिसिल्वा, अॅड. जितेंद्र गावकर, प्रणव परब, पॅलेसिया रापोज, पार्वती नागवेकर, सई वळवईकर, मुक्तमाला फोंडवेकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com