Nigerian citizen arrested in Goa Dainik Gomantak
गोवा

नायजेरियन पर्यटकाकडून गोव्यात 7.40 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

संशयित भारतात पर्यटक व्हिसावर गोव्यात आला होता व भाडेपट्टीवर खोली घेऊन राहत होता. तो कोणताच व्यवसाय करत नसून अंमली पदार्थ विक्रीमध्ये गुंतला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गुन्हे अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने काल रात्री उशिरा करासवाडा - म्हापसा येथे नायजेरियन नागरिक आमेची दोनाटस (48 वर्षे) याला अटक करून त्याच्याकडून विविध प्रकारचा सुमारे 40 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले. या अंमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे 7.40 लाख रुपये आहे.

या छाप्यावेळी जप्त केलेल्‍या अंमली पदार्थामध्ये 88 एलएसडी ब्लॉटिंग पेपर्स 1.45 ग्रॅम, 19.32 ग्रॅमच्या गुलाबी रंगाच्या एक्स्टसी टॅबलेटस्, 5.47 ग्रॅम निळ्या रंगाच्या एक्स्टसी टॅबलेट्स, 13.20 ग्रॅम मेटाम्फेटामाईन याचा समावेश आहे. पोलिस खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विदेशी पर्यटक राखाडी रंगाचा टी शर्ट व जीन्स घालून करासवाडा येथील शांताई अपार्टमेंजवळ नेहमीच्या ग्राहकाला नायजेरियन नागरिक विक्री करण्यासाठी येणार असल्याचे कळले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक राहुल परब यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात सापळा रचण्यात आला होता. या वर्णनाचा विदेशी नागरिक मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीने आला व तो ग्राहकाची वाट पाहत होता. पोलिसांनी त्याला चारी बाजूने घेरले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ विविध प्रकारचा अंमली पदार्थ आढळून आला.

संशयित भारतात पर्यटक व्हिसावर गोव्यात आला होता व भाडेपट्टीवर खोली घेऊन राहत होता. तो कोणताच व्यवसाय करत नसून अंमली पदार्थ विक्रीमध्ये गुंतला आहे. त्याने हा अंमली पदार्थ कोठून आणला तसेच त्याच्या पासपोर्टची माहिती मिळवण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी दिली. मुंबई येथे काही दिवसांपूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अंमली पदार्थ साठाच्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केल्यानंतर गोव्यातील पोलिसही सतर्क झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT