Goa Work Place Harrasment Dainik Gomantak
गोवा

Goa Work Place Harrasment: 65 वर्षीय व्यवस्थापकाकडून सहकारी तरूणीचा लैंगिक छळ; गोव्यात खासगी कंपनीतील प्रकार

गुन्हा दाखल; पोलिसांनी संशयिताला केली अटक

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Work Place Harrasment: गोव्याची राजधानी पणजीत एका खासगी कंपनीतील व्यवस्थापकाने आपल्याच कंपनीत कार्यरत असलेल्या 24 वर्षीय तरूणीचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.

जयकृष्ण शेट्टी (वय 65) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो येथील एका खासगी कंपनीमध्ये मॅनेजर (व्यवस्थापक) म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ केल्याची तक्रार संबंधित तरूणीने दिली आहे.

हा प्रकार बुधवारी घडला होता. त्यानंतर मुलीने पोलिसात तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे की, व्यवस्थापक शेट्टी याने शरीराला वाईट पद्धतीने स्पर्श केला. तसेच तिच्याशी बोलताना अश्लील शब्द वापरले. पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंद करत व्यवस्थापकाला अटक केली.

संबंधित पीडीत तरूणी ही मूळची कर्नाटकातील आहे. तिच्याबाबत हा प्रकार घडल्यानंतर तिला याबाबत कुठेही व्याच्यता करू नये म्हणून व्यवस्थापकाने धमकावल्याचेही तरूणीने पोलिसांना सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT