Temperature on Rise According to IMD Goa : गोव्यात गेल्या काही दिवासात तापमानात बदल होऊ लागला आहे. गुरूवारी गोव्यात हवामान कोरडे होते.
भारतीय हवामान विभागाच्या पणजी केंद्राने गोव्यात गुरूवारी 34.4 कमाल तापमानाची नोंद केली. जे सामान्य तापमानापेक्षा 1.1 सेल्सियसने जास्त आहे.
दरम्यान, येत्या रविवारी गोव्यातील तापमानानात दोन अंश सेल्सियसने वाढ होऊ शकते, असा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे.
गोवा वेधशाळेने 17 एप्रिलपर्यंत काही ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शुक्रवारी सकाळी काही ठिकाणी धुके पडले होते. शुक्रवारी आणि शनिवारी या दोन दिवसात कमाल तापमानात मोठा बदल अपेक्षित नाही.
तथापि, तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तापमानात एक ते दोन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोमवारी तापमानात एक ते दोन अंशांची घसरण होईल. त्यानंतर तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही, असा आयएमडीचा अंदाज आहे.
याशिवाय, गोव्यासाठी इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसकडूनही हाय टाईडचा इशारा देण्यात आला आहे. अर्धा ते एक मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.