Goa Government Dainik Gomantak
गोवा

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांकडून 64 लाख वसूल

Government Employee: गृहआधारचा गैरफायदा : 89 जणांच्या कुटुंब सदस्यांनी पैसे केले परत

दैनिक गोमन्तक

गंगाराम आवणे

Government Employee: सरकारी सेवेत असतानाही सामान्य मध्यमवर्गीय नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेता येत नाही, हे माहीत असूनही काही सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंब सदस्यांसाठी गृहआधार योजनेचा लाभ घेतला.

मात्र, अशा सरकारी कर्मचाऱ्यांना महिला व बालविकास संचालनालयाकडून दणका देण्यात आला आहे. ज्यांनी या योजनेसाठी अपात्र असून देखील लाभ घेतला, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक उत्पन्नाची मर्यादा ओलांडली आहे.

त्या कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

महिला आणि बालविकास संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत 64 लाख 84 हजार 490 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. गृहआधार योजनेचा गैरफायदा घेतलेल्या 89 कर्मचाऱ्यांची वसुली करण्यात आली असून एकूण 2960 कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडूनही वसुली करण्यात येणार आहे. काही सरकारी कर्मचारी हे स्वतःहून येऊन रक्कम परत करतात, परंतु बहुतेकांना नोटिसा पाठवाव्या लागत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT