62 lakh fine from traffic offenders  Dainik Gomantak
गोवा

Traffic Rules Violation: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून 62 लाख दंडवसुली!

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध (Violation of traffic rules) कारवाई करून दंड (Penalty) स्वरूपात 62 लाख रुपयांची वसुली केली आहे.

दैनिक गोमन्तक

Traffic Rules Violation: मडगाव पोलीस हद्दीतील वाहतूक पोलीस विभाग कार्यालयाने वर्ष 2021 मध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध (Violation of traffic rules) कारवाई करून दंड (Penalty) स्वरूपात 62 लाख रुपयांची वसुली केली आहे. तर पाचहून अधिक वेळा नियम मोडणाऱ्या 54 वाहनचालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

तसेच 20 हजारापेक्षा जास्त विध्यार्थ्यांना वाहन चालविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले असल्याची माहिती मडगाव वाहतूक पोलीस निरीक्षक गौतम साळुंके यांनी दिली आहे.

पुढे त्यांनी सांगितले की, 'ट्राफिक नियम न पाळणाऱ्यांची 2021 मध्ये वाहनचालकांची संख्या 54 हजारापर्यंत अशी आहे. ज्यांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन केले आहे. यात सर्वाधिक 30 हजार पर्यंत विना हेल्मेट गाडी चालविणाऱ्या चालकांचा समावेश आहे. त्यानंतर 1 हजार चालकांकडून बेदरकारगतीने वाहन चालविण्या प्रकरणी दंड वसूल करण्यात आला आहे .

लायसन्स रद्द करणाऱ्यांची एकंदरीत संख्या 1500 अशी आहे. याबरोबरच वाहन चालवीत असताना मोबाईवर बोलणे, सीट बेल्ट न वापरणे, दारू पिऊन गाडी चालविणे, मालवाहू गाडीमध्ये लोकांना बसवून नेणे, सिग्नल तोडून पुढे जाणे असे गुन्हे करणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

या बरोबरच 60 हजार जणांना गाडी चालविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले असल्याचे साळुंखे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT