उमेदवारीसाठी निकष महत्त्वाचे म्हणत फडणवीसांनी चारली पर्रीकरांच्या मुलाला धूळ

लोकांच्या मनातील उमेदवार मीच म्हणणाऱ्या उत्पल पर्रीकरांकडे निवडून येण्याची क्षमता महत्त्वाची
Devendra Fadnavis and  Utpal Parrikar
Devendra Fadnavis and Utpal Parrikar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजी (Panaji) विधानसभा मतदारसंघात भाजपकडून (BJP) विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे उत्पल पर्रीकर हे निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. यावर ''गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी पक्ष वाढीसाठी आणि गोव्यासाठी (Goa election 2022) भरीव योगदान दिले आहे. मात्र, पर्रीकरांचा मुलगा उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना उमेदवारी मिळणार नाही. निवडून येण्याची क्षमता आणि इतर निकषांवर उमेदवारीचा निर्णय संसदीय मंडळ घेत असते'' अशी प्रतिक्रिया गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. (Goa Lelection 2022: Latest news updates on Utpal Parrikar

Devendra Fadnavis and  Utpal Parrikar
AAP Candidate: 'आप'तर्फे उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

उत्पल पर्रीकर यांनी गेल्या महिनाभरापासून पणजीत (Panaji) प्रचार करत आहेत. पक्षाने उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढविणार, असे त्यांनी जाहीर केले आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी त्यांनी आता मागे वळून पाहणार नाही असे ट्विट करत पक्षाला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. या सर्व घडामोडींवर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्पल यांना दिल्लीला बोलावून घेत कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवू नये असा सल्ला दिला. त्यानंतर फडणवीस यांनी उत्पल यांच्या भूमिकेवर भाष्य केले.

Devendra Fadnavis and  Utpal Parrikar
उत्पल पर्रीकरांना तिकीट देणार का? फडणवीसांचं रोखठोक उत्तर

पणजीत कुणीही फिरले तर त्यांना समजेल की मनोहर पर्रीकर आणि पक्षासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या ते खूप नाराज आहे. गेल्या निवडणुकीत मला तिकीट नाकारण्यात आले. त्यावेळी मी काही बोललो नाही. मात्र, मी पणजीमध्ये निवडणूक लढवावी असे लोकांना वाटते. पर्रीकरांचे पुत्र म्हणून मला उमेदवारी पाहिजे असती तर गेल्या वेळीच मी ते केले असते.

- उत्पल पर्रीकर, भाजप

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com