Mopa International Airport  Dainik Gomantak
गोवा

जानेवारी 2022 पर्यंत मोपा विमानतळाचे 60 टक्के काम पूर्ण

पहिला टप्पा 15 ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित; नागरी उड्डयन संचालक सुरेश शानभोगे यांनी दिली माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात मोपा ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम चालू असुन, हे राज्यातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे. दरम्यान, या विमानतळाच्या पायाभूत सुविधांचे काम जानेवारी 2022 पर्यंत 60% पूर्ण झाले आहे. (60% work complete of Mopa international Airport by January 2022 in goa)

तसेच, प्रकल्पाचा पहिला टप्पा 15 ऑगस्ट 2022 च्या अंतिम मुदतीनुसार कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. अशी माहिती नागरी उड्डयन संचालक सुरेश शानभोगे यांनी दिली, ते पुढे म्हणाले विमानतळ (Mopa International Airport) टर्मिनल इमारतीच्या विस्तारीकरणाचे काम जोरात सुरू आहे, तर विमानतळाच्या धावपट्टी आणि टॅक्सीवेचे काम जवळपास पूर्ण झाले असून, त्यांना अंतिम कोट देण्यात येत आहे. “याशिवाय, विमानतळाची इमारत तयार आहे, तर एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) टॉवरचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे,” असे ते म्हणाले,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते वर्षाच्या अखेरीस स्वातंत्र्यदिनी राज्यातील या दुसऱ्या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. नागरी विमान वाहतूक संचालकांनी सांगितले, “30 विमानतळ बचाव आणि अग्निशमन (ARFF) प्रशिक्षणार्थी , स्थानिक स्तरावर निवडलेल्या सर्वांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी रायबरेली येथे पाठवण्यात आले आहे आणि हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना विमानतळावरील कर्तव्यावर त्वरित रुजु करुन घेतले जाईल.”

विमानतळाच्या बांधकामाला 634 दिवसांचा विलंब

पुढे बोलताना शानभोगे म्हणाले की, पर्यावरणाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणे आणि सध्या सुरू असलेल्या कोविड-19 (Covid-19) महामारीमुळे झालेला खर्च आणि वेळ यामुळे विमानतळासाठी सुरुवातीच्या प्रकल्पाची किंमत 1,900 कोटी रुपये होती, ती आता 2,615 कोटी रुपये इतकी वाढली आहे. विमानतळ प्रकल्प अंतिम मुदतीनुसार पूर्ण करण्यासाठी 3,500 हून अधिक कामगार आता दोन शिफ्टमध्ये काम करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. विविध न्यायालयांच्या निर्बंधांमुळे विमानतळाच्या बांधकामाला 634 दिवसांचा विलंब झाला आणि साथीच्या आजारामुळे 90 दिवसांचा विलंब झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT