Dayanand Narvekar
Dayanand Narvekar Dainik Gomantak
गोवा

क्रिकेट तिकीट विक्री घोटाळा प्रकरणातून सर्व संशयित निर्दोष

दैनिक गोमन्तक

मडगाव : माजी उपमुख्यमंत्री आणि गोवा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष दयानंद नार्वेकर यांचा समावेश असल्याने 21 वर्षांपूर्वी अत्यंत गाजलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील कथित तिकीट विक्री घोटाळा प्रकरणातील सर्व 9 संशयितांविरोधात अभियोग पक्ष एकही पुरावा न्यायालयासमोर आणू न शकल्याने सर्वांना आज निर्दोष मुक्त करण्यात आले. (60 lakh ticket sales scam all innocent - Dayanand Narvekar )

मडगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कार्लो सिल्वा यांनी आज हा निवाडा जाहीर केला. हा निवाडा जाहीर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नार्वेकर यांनी 'सत्यमेव जयते' या शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

काय घडले प्रकरण ?

6 एप्रिल 2001 रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फातोर्डा येथे झालेल्या पाचव्या आणि निर्णायक एकदिवस सामन्याच्यावेळी जवळपास 60 लाख रुपयांच्या बनावट तिकिटे छापून ती वितरित केल्याचा संशयितांवर आरोप होता. दयानंद नार्वेकर यांच्यासह गोवा क्रिकेट संघटनेचे तत्कालीन खजिनदार रामा शंकरदास, सरचिटणीस विनोद फडके, तिकीट ठेकेदार चिन्मय फळारी यांच्यासह एकूण 9 संशयितांविरोधात भा.दं.संच्या 120 (ब), 465, 468, 471, 420 व 201 या कलमाखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र अभियोग पक्ष यातील एकही आरोप सिद्ध करू शकला नाही.

या निवाड्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना, आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही हे आम्ही आधी पासून सांगत आलो होतो. राजकीय दृष्ट्या आम्हाला या प्रकरणी विनाकारण गोवण्यात आले होते. आम्ही जे काय त्यावेळी सांगत होतो ते सत्य होते हे आजच्या निर्णयाने सिद्ध झाले अशी प्रतिक्रिया नार्वेकर यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

कोर्टात 13 महिन्यांच्या बाळाला तिने फरशीवर फेकले, न्यायाधीशही चकित झाले; वाचा नेमकं प्रकरणं

Goa Today's Live News: गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार - मुख्यमंत्री डॉ. सावंत

SCROLL FOR NEXT