कुंकळ्ळी पालिकेत रंगले ‘तू तू मैं मैं’ ; बैठकीत गोंधळ

विरोधी नगरसेवक व नगराध्यक्ष एकमेकांविरुद्ध भिडले
Controversial situation in Cuncolim Municipality
Controversial situation in Cuncolim Municipality Dainik Gomantak
Published on
Updated on

कुंकळ्ळी : कुंकळ्ळी नगरपालिका मंडळाची द्वैमासिक बैठक आज गोंधळात पार पडली. विरोधी नगरसेवक उदेश देसाई व नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांच्यातील ‘तू तू मैं मैं’च्या वादात महत्त्वाचे विषय बाजूलाच राहिले.

नगरसेवक उदेश नाईक देसाई यांना बैठकीत गोंधळ घातल्यास बैठकीतून बाहेर काढण्याचा आपल्याला कायद्याने अधिकार असल्याचे नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांनी इशारा दिला असता नगराध्यक्ष व नगरसेवक उदेश नाईक यांच्यात शाब्दिक चकमक झडली.

उदेश नाईक नाईक यांनी नगराध्यक्ष लोकप्रतिनिधींना पालिका बैठकीत बोलण्यास देत नसून हुकूमशहासारखे वागतात असा गंभीर आरोप लक्ष्मण नाईक यांच्यावर केला.

नगराध्यक्ष गेल्या दीड वर्षांपासून तेच तेच विषय बैठकीत आणतात. विकासकामांची यादी मागतात. मात्र, गेल्या दीड वर्षात विकासकामे साध्य करण्यात नगराध्यक्ष नाईक अपयशी ठरल्याचा दावा उदेश नाईक देसाई यांनी केला.

गोवा एनआयटीकडून पालिकेला शूल्काच्या रूपाने जो निधी मिळाला आहे, त्याचा वापर कामगाराची वेळोवेळी मंजुरी देण्यासाठी करावा अशी मागणी नगरसेवक विदेश देसाई यांनी केली. कामगारांना उपाशी ठेऊन कसला व का विकास करावा? असा प्रश्न विदेश देसाई यांनी केला.

Controversial situation in Cuncolim Municipality
उच्च न्यायालयाकडून सरकारला मोठी चपराक : सुदीप ताम्हणकर

भाडेपट्टीवर घरे दिलेल्या घरमालकांकडून एका महिन्याचे भाडे व कचरा शुल्क आकारण्याचा ठराव पुन्हा एकदा या बैठकीत घेण्यात आला. पालिकेचे नव्या इमारतीत स्थलांतर करण्यासाठी आवश्यक असलेली सामुग्री आणण्यासाठी निधी खर्च करण्याची मान्यता यावेळी घेण्यात आली.

नगरसेवक उदेश नाईक देसाई व पोलिटा कार्नेरो यांनी पत्रकारांना सांगितले, की नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक मनमानी करीत असून गेल्या दीड वर्षात एकही विकासकाम झालेले नाही. गटारावर घालण्यासाठी लाद्या देण्याचे कबूल केल्यास सहा महिने उलटले, तरी नगराध्यक्षांनी एकही लादी दिली नसल्याचा आरोप उदेश नाईक देसाई यांनी केला.

नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक हे अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी लायक नसून त्यांना काही राजकीय शक्तींचा पाठिंबा असल्याचा आरोप देसाई यांनी केला.

‘गाडेवाल्यांना स्वच्छतेची सक्ती करा’

कुंकळळी बाजारातील खाद्य पदार्थ विकणारे गाडेवाले योग्य ती स्वच्छता ठेवत नाहीत. बाजारात व पदपथ अडवून उभे असलेले गाडे पार्कींग जागेच्या कडेला व्यवस्थित ठिकाणी हलवावे व त्या गाडेवाल्यांना स्वच्छता ठेवण्याची सक्ती करावी अशी मागणी काही नगरसेवकांनी केली. मात्र, गोंधळामुळे हा विषय अधांतरीच सोडून देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com