Vasco Death News Dainik Gomantak
गोवा

6 वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू! चिखली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर-कर्मचाऱ्यांना घेराव

रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे

Kavya Powar

Vasco Death News: वाड्डे येथील दुर्गा माता मंदिराजवळ राहणाऱ्या वाणी खानापूर या 6 वर्षीय मुलीचा डेंग्यूच्या तापाने मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ आज (मंगळवारी) संतप्त नागरिकांनी चिखली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना घेराव घातला. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला.

काल (सोमवारी) संध्याकाळी मुलीला चिखली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी पहाटे तिचा रक्तदाब कमी झाल्याने तिला बांबोळी येथील जीएमसी रुग्णालयात हलवण्यात आले.

त्यानंतर, आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास डेंग्यूच्या तापावर जीएमसीमध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

चिखली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप न्यू वाड्डे येथील रहिवाशांनी केला असून, या प्रकरणाची संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT