फातोर्डा : मागील काही दिवसात गोव्यात अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला असून प्यालेल्या अवस्थेत कुणी वाहन चालविताना आढळल्यास चालकाच्या विरोधात 'एफआयआर' दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण गोव्याचे वाहतूक पोलीस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी दिली. उद्या 2 ऑगस्ट पासून ही कारवाई सुरू होणार असे त्यांनी सांगितले. उद्यापासून गोव्यात दारू पिऊन वाहन चालविल्यास 6 महिने तुरुंगवास अन् 10 हजार दंड आकरण्यात येणार आहे.
झुआरी पुलावर मध्यरात्री वाहन नदीच्या पात्रात पडून चौघा जणांचा मृत्यू झाला होता. अतिवेगाने आणि दारू पिलेल्या अवस्थेत वाहन चालविल्याने हा अपघात घडला होता. या प्रकरणाची वाहतूक विभागाने गांभीर्याने दखल घेतली असून या नंतर दारू पिऊन व अतिवेगाने वाहन चालविल्यास वाहनचालकाला कठोर कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचे आंगले यांनी मडगाव येथील पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले .
पुढे त्यांनी बोलताना सांगितले रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक अपघाताला आळा घालण्यासाठी अशी कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला आहे. अल्पवयीन मुलांनी वाहने चालविल्याचे आढळून आल्यास त्या मुलांच्या पालकांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवसोदिवस वाहतूक अपघातांचे प्रमाण वाढत आहे . मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी झालेल्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. यात अपघातात मृत्यू होण्याचे प्रकार घडण्याचे प्रकार म्हणजे दारूच्या नशेत वाहन चालविणे आणि अतिवेगाने वाहन चालविणे यासाठी घडले आहेत. अशी 133 प्रकरणे गोवा राज्यात यावर्षी घडली असून यात 31 जण मृत्यूमुखी पडले आहेत.
झुआरी पुलावरचे प्रकरण मध्यरात्री घडले असल्याने या नंतर वाहतूक खात्यातर्फे मोक्याच्या ठिकाणी वाहतूक पोलीस नेमून दिवसरात्र अशा प्रकारांवर देखरेख ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले .
वाहतूक विभागाला अल्पवयीन मुलेही वाहने चालवीत असल्याचे निदर्शनात आले आहे . या प्रकरणी कोणताही अल्पवयीन वाहन चालक सापडल्यास वाहनमालकास जबाबदार धरले जाणार आहे आणि त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार आहे . तसेच पुढील कारवाईसाठी हे प्रकरण मुख्य न्यायिक दंडाधिकारी वर्गाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे .
अशा प्रकारे अपघात होत असल्याच्या प्रकरणाची गंभीर दाखल घेण्यात आली आहे याची अमलबजावणी उद्या 2 ऑगस्ट पासून करण्यात येणार असल्याचे दक्षिण गोवा वाहतूक पोलीस निरीक्षक आंगले आणि सांगितले. तसेच 2022 यावर्षी 1824 प्रकरणे अपघाताची घडली असून मागच्या वर्षात हे प्रमाण 1519 एव्हढे होते. यात अपघाताची एकंदरीत प्रकरणे 133 घडली असून या अपघातात 143 जणांचे बळी गेले आहेत असे त्यांनी सांगितले .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.