No Confidence Motion Aginst Sarpanch And Dy Sarpanch Of Dikarpal Davorlim Panchayat Dainik Gomantak
गोवा

Dikarpal Davorlim Panchayat: दवर्ली-दिकरपालच्‍या सरपंच व उपसरपंचावर अविश्वास ठराव दाखल

अविश्वास ठरावावर 11 पैकी एकूण सहा पंचसदस्‍यांनी सह्या केल्‍या आहेत

Rajat Sawant

No Confidence Motion Aginst Sarpanch And Dy Sarpanch Of Dikarpal Davorlim Panchayat: दवर्ली-दिकरपालच्‍या सरपंच व उपसरपंचावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला. या अविश्वास ठरावावर 11 पैकी एकूण 6 पंचसदस्‍यांनी सह्या केल्‍या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दवर्ली-दिकरपाल पंचायतीचे सरपंच हेर्कुलान नियासो आणि उपसरपंच मिशेल मिरांडा या दोघांवर पंचायतीच्या सहा पंचसदस्‍यांनी अविश्वास ठराव दाखल केला. याबाबतच्या निर्णयावर सहा पंचसदस्यांनी सह्या करीत गटविकास अधिकार्‍याच्‍या कार्यालयात हा ठराव दाखल करण्‍यात आला.

या अविश्वास ठरावावार संतोष नाईक, विद्याधर आर्लेकर, साईश राजाध्‍यक्ष, संपदा नाईक, कार्मिनो कारव्हालो, विधी वरक यांनी सह्या केल्‍या आहेत.

पंचायतीत निर्णय घेताना सरपंच व उपसरपंच अन्य पंच सदस्यांना विश्वासात घेत नाही, विकासकामे करताना सहकार्य न करणे तसेच पारदर्शकता न ठेवणे, पंचायतीच्‍या निधीचा गैरवापर करणे, लाेकांची कामे अडवून ठेवणे असे आरोप पंच सदस्यांनी सरपंच व उपसरपंचावर ठेवले आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT