Goa Petrol-Diesel Price Dainik Gomantak
गोवा

Fraud in Goa : निम्म्या किमतीत डिझेलचे आमिष दाखवत एक लाखांचा चुना

याप्रकरणी कोलवा पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

सुशांत कुंकळयेकर

Fraud in Goa : निम्म्या किमतीमध्ये डिझल इंधन पुरवठा करतो असे सांगून मोबोर येथील एका व्यक्तीची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. मिंगेल रोड्रिग्स (57) असं या व्यक्तीचं नाव असून त्याला एक लाख रुपयांचा चुना एका ठगाने लावला आहे. या व्यवहारात आपण फसवले गेलो हे लक्षात आल्यावर त्याने आता पोलिसात तक्रार दिली आहे.

रॉड्रिग्ज यांनी कोलवा पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत कॅप्टन दीपक कुमार नावाच्या एका इसमाने आपल्याला मोबाईलवरून संपर्क साधून अर्ध्या किमतीमध्ये डिझल पुरवठा करतो असे सांगितले. त्यासाठी इरफान मन्सुरी याच्या खात्यामध्ये एक लाख रुपये जमा करायला लावले.

रॉड्रिग्ज यांनी या खात्यात ही रक्कम जमा केली मात्र त्यांना इंधन पुरवठा केलाच गेला नाही. अशाने त्याने आपली फसवणूक केली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी कोलवा पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

केवायसीच्या नावाखाली फातोर्ड्यातील एका महिलेला लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. एसबीआय या नामांकित बँकेचा कर्मचारी असल्याचं भासवत तोतयाने महिलेचे तब्बल 10.53 लाख लुटले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात तक्रार दाखल केली असून तपास सुरु केला आहे.

तर दुसरीकडे एका नामांकित कंपनीची डिलरशिप देण्याचे आमिष दाखवून 12.75 लाखांना गंडा घातल्याप्रकरणी सांताक्रुझ येथील एका कंपनीने सायबर क्राईम पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

आयटीसी कंपनीचा कर्मचारी असल्याची बनावट ओळख दाखवून संशयिताने तक्रारदाराला ऑनलाईन गंडा घातल्‍याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्‍या माहितीनुसार, सांताक्रुझ येथील एका कंपनीला एका व्यक्तीने आपण आयटीसी कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले आणि त्याची फसवणूक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT