Closed school  Dainik Gomantak
गोवा

रिक्त शाळा भाडेपट्टीसाठी एनजीओचे 53 अर्ज

शैलेश झिंगडे : दोन टप्प्यांत जाहिरातीनंतर 18 इमारती शिल्लक

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यातील बंद पडलेल्या आणि वापरात नसलेल्या सरकारी शाळेच्या इमारती बिगर सरकारी संस्था (एनजीओ) आणि सरकारी खात्यांना भाडेपट्टीवर देण्याचा निर्णय सरकारने जुलै 2021 मध्ये घेतला होता.

इमारती भाडेपट्टीवर देण्यासाठी दोन टप्प्यात जाहिराती दिल्या गेल्या होत्या. पहिल्या टप्प्यात 68 व दुसऱ्या टप्प्यात 7 असे एकूण 75 इमारतींसाठी ही जाहिरात दिली असून त्यांपैकी 53 अर्ज एनजीओ, 22 इमारती सरकारी खात्यांना देण्यात आल्या आहेत, तर 18 इमारतींसाठी अर्ज आलेले नाही, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिली आहे.

पहिल्या टप्प्यात विनावापर रिक्त असलेल्या 68 शाळा इमारतींसाठी जाहिरात करण्यात आली होती. त्यांपैकी 20 इमारती सरकारी खात्यांना भाडेपट्टीवर दिलेल्या आहेत. 49 इमारतींसाठी एनजीओकडून अर्ज मिळाले आहेत.

33 इमारती एनजीओना भाडेपट्टीवर देण्यासाठी उपलब्ध आहेत, तर 15 इमारतींसाठी अद्याप एकही अर्ज आलेला नाही. दुसऱ्या टप्प्यात 7 इमारतींसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यांपैकी 2 इमारती सरकारी खात्यांना देण्यात आल्या आहे, 4 इमारतींसाठी एनजीओकडून अर्ज आले आहेत.

केवळ 2 इमारती भाडेपट्टीवर देण्यासाठी उपलब्ध आहे आणि 3 इमारतींसाठी अर्ज आलेले नाही, अशी आकडेवारी शिक्षण खात्याने दिली आहे.

जुलै 2021 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वापरात नसलेल्या सरकारी शाळेच्या जमिनी आणि इमारती ‘ना नफा’ कमावणाऱ्या संस्था आणि सामाजिक संस्थांना भाडेपट्टीवर देण्याचा निर्णय घेतला होता.

सरकार अशा संस्थांकडून नाममात्र भाडे आकारणार होते. तसेच अंगणवाड्या असलेल्या शाळांच्या इमारती अंगणवाड्या चालविण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण संचालनालयाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय झाला होता.

सरकारी खात्यांना 22 शाळा

सरकारी खात्यांना भाडेपट्टीवर देण्यात आलेल्या 22 शाळा इमारतींमध्ये आरोग्य, महिला व बाल कल्याण, पंचायत, कामगार आणि हस्तकला यांचा समावेश आहे. वापरात नसलेल्या शाळांचा वापर या खात्यांकडून केला जात आहे.

(प्रसाद सावंत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT