Verna Accident  Dainik Gomantak
गोवा

Verna Accident News: चारचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू; पतीची प्रकृती गंभीर

चारचाकी चालकाला वेर्णा पोलिसांनी घेतले ताब्यात

दैनिक गोमन्तक

Verna Accident News: गोव्यात होणाऱ्या वाहनांच्या अपघातांचे प्रमाण गेल्या काही दिवसांच्या तुलनेत वाढले आहे. दर दोन दिवसात अपघाताच्या घटना घडत आहेत. प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. परवा फोंडा येथे झालेल्या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला आहे. (52 years old women died in accident at verna)

फोंडा येथील गोसावी वाडा येथील ग्रीष्मा देसाई (52) यांचा रविवारी कुठ्ठाळी अपघात झाला ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. गोविंद देसाई (57) आणि ग्रीष्मा देसाई हे दोघेजण दुचाकीवरून जात असताना चारचाकीने धडक दिल्याने हा अपघात (Accident) घडला. दोन्ही वाहने वेर्णाच्या दिशेने निघाली होती.

वेर्णा पोलिसांनी (Verna Police) दिलेल्या माहितीनुसार, त्यांना धडक चारचाकी चालक बेदरकारपणे वाहन चालवत होता. यालागुरडाप्पा कुन्नूर (26) हा मूळचा बागलकोट, कर्नाटक इथला रहिवासी असून याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय त्याची चारचाकीही जप्त करण्यात आली आहे. गोविंद देसाई यांना गंभीर दुखापत झाली असून ग्रीष्मा यांना मडगाव येथील हॉस्पिसिओ रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT