Solar Power Equipment
Solar Power Equipment Dainik Gomantak
गोवा

Goa Environment: सौर उर्जा उपकरणांसाठी सरकारचे 50 टक्के अनुदान पण...

दैनिक गोमन्तक

Goa Environment: गोव्यात कोळसा आधारित वीज प्रकल्प नको म्हणणारे स्वतः मात्र कोणतेच प्रयत्न करायला तयार नाहीत. सरकारने सौर उर्जा उपकरणांसाठी 50 टक्के अनुदान देणारी योजना आणली. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिक पुढे येताना दिसत नाहीत,अशी खंत पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त केली.

ते राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आंतराष्ट्रीय पर्यावरण आणि शाश्‍वतता परिषदेच्या उद्‍घाटन समारंभात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पर्यावरण सचिव अरूण मिश्रा, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील,सीआयआयचे उपाध्यक्ष अनिरूद्ध अगरवाल, व शमिला मोंतेरो उपस्थित होत्या.

4 फेब्रुवारीपर्यंत ही परिषद चालणार असून विविध परिसंवादांचे तसेच पर्यावरण संवर्धनात उपयुक्त ठरणाऱ्या उपकरण आणि इतर साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

दरम्यान, क्राबाल म्हणाले, आता विद्युत वाहने एकदा चार्ज केली की, सहाशे ते सातशे किलोमीटर पर्यंत चालतात. तंत्रज्ञानात मोठ्याप्रमाणात बदल होत आहेत. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाच्या पंतप्रधानांच्या व्हिजनचा भाग बनण्याचा आमचा मानस आहे.

पर्यावरण हानी रोखण्यावर भर द्या : जैवविविधता आणि अर्थकारण यांचे संतुलन राखत केलेले विकास हा शाश्‍वत विकास आहे. गरिबी हे पर्यावरणाला असलेले सर्वात मोठे आव्हान आहे. शाश्‍वत विकासासाठी तंत्रज्ञानाचे योगदान महत्त्वाचे आहे.

कंपन्यांनी उत्पादन बनविताना पर्यावरणाची हानी कमी कशी होईल, यावर भर देणे गरजेचे आहे. ग्राहकांनी पर्यावरण संवर्धनासाठी शक्य तेवढा अधिक काळ उपकरणांचा वापर करावा तसेच सरकारी स्तरावर पर्यावरण संबंध विविध संस्था आपले काम योग्य करत आहेत का, यावर लक्ष देणे गरजेचे आहे,असे अरूण मिश्रा यांनी सांगितले.

सर्वांचे योगदान हवे- सिंग

हवामान बदलाचे आव्हान रोखण्यासाठी केवळ नियम करून भागणार नाही, तर त्यासाठी विविध संघटना, उद्योग समूह तसेच नागरिक या सर्वांचे योगदान गरजेचे आहे,असे प्रतिपादन सॅब इंडियाचे बिकास सिंग यांनी केले.

ते हवामान बदलांवर आयोजित परिसंवादात बोलत होते. यावेळी ‘स्कोडा’चे उपाध्यक्ष संदीप खरे, सन 360 कंपनीचे प्रमुख अनिष सौझा, सुद-केमीचे व्यवस्थापक श्री श्रीनिवास उपस्थित होते. सिंग पुढे म्हणाले, हवामान बदल परिणाम शून्यावर आणण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे योगदान देऊ शकते.

हरित उर्जेला प्राधान्य आवश्‍यक

जगभरात हवामान बदलाचे परिणाम दिसून येत आहेत. तापमानवाढ, समुद्राच्या पातळीत वाढ आदी समस्या जाणवत आहेत, हवामान बदल, जैवविविधतेची हानी आणि गरिबी ही तीन देशापुढील आव्हाने आहेत.

या बाबींबर अधिक काम करण्याची गरज आहे. भारतात सर्वात अधिक युवक आहेत. तसेच देशात अनेक प्रकल्प उभारले जात आहेत. आम्ही विकसनशील देश आहोत, त्यामुळे कोळसा, वीज यांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे असून हरीत उर्जेच्या वापराला प्राधान्य देणे गरजेचे आहे,असे ‘स्कोडा’चे उपाध्यक्ष संदीप खरे यांनी सांगितले.

प्रभू, सावंत अनुपस्थित

परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी राज्यसभा सदस्य आणि माजी केंद्रियमंत्री सुरेश प्रभू हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित राहणार होते. पण ते अनुपस्थित राहिले. मंत्री नीलेश काब्राल म्हणाले मुख्यमंत्री सावंत यांना गोव्याबाहेर जावे लागल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांनी या परिषदेला शुभेच्छा दिल्या असून ते नेमके कोठे गेले, याबाबत काहीच सांगितलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT