Crime Dainik Gomantak
गोवा

Crime News : ५० लाखांची मद्यतस्करी, निरीक्षकही रडारवर; गुजरात पोलिसांकडून गोव्यातील दोघांना अटक

Crime News : प्रमाणपत्र कसे दिले याची होणार तपासणी; गुजरातमधील नवसारी येथील पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने ५०.४० लाख रुपयांची दारू जप्त केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News :

पणजी, राज्यामध्ये विविध ब्रॅण्डच्या बनावट मद्याचे उत्पादन होते, हे आता गुजरातमध्ये झालेल्या कारवाईने उघड झाले आहे.

गुजरात पोलिसांचा तपास आता बनावट मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीत नियुक्त असलेल्या अबकारी निरीक्षकांपर्यंत येऊन पोचला आहे. कंपनीत बनावट दारू उत्पादित झाली तर तेथे तैनात असलेल्या अबकारी निरीक्षकाच्या ती बाब लक्षात कशी आली नाही आणि त्याने उत्पादनाला प्रमाणपत्र कसे दिले, असा मुद्दा आता तपासादरम्यान उपस्थित झाला आहे.

गुजरातमधील नवसारी येथील पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने ५०.४० लाख रुपयांची दारू जप्त केली आहे. अबकारी खात्याचे निरीक्षक मद्य उत्पादन करणाऱ्या प्रत्येक कारखान्यामध्ये असतात. त्यांनी मद्य उत्पादनाचेप्रमाणपत्र दिल्याशिवाय त्याची वाहतूक करता येत नाही.

असे असतानाही एका ब्रॅण्डच्या नावाचा वापर करून बनावट मद्याचे उत्पादन कसे झाले, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. गुजरात पोलिसांनी गोव्यात येऊन त्या कंपनीच्या मालकाला आणि त्या मद्याची विक्री करणाऱ्याला अटक करून ते त्यांना गुजरातला घेऊन गेले आहेत. त्यांच्या चौकशीतून त्याचमुळे या सगळ्या प्रकरणाची मोठी व्याप्ती आता बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवसारी येथे नऊ मार्च रोजी एका ट्रकची तपासणी करताना पोलिसांना ही दारू जप्त केली. गुजरातमध्ये पूर्णतः दारूबंदी असल्याने तात्काळ ती जप्त केली. ट्रकचालक विक्रम बोईल याची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर याचे धागेदोरे त्यांच्या हाती लागले. हे मद्य विकलेल्या फ्रान्सिस डिसोझापर्यंत गुजरात पोलिस पोचले.

त्याच्याकडून मद्य कारखानदार मनीष मिश्रा याच्यापर्यंत ते पोचले. गुजरात पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली असून त्यांना २६ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील केवळ ट्रकचालक हा राजस्थानचा नव्हता, तर मिश्रा यांच्याकडून डिसोझा यांनी मद्य विकत घेतले आणि राजस्थान येथील सुरेश बिश्नोई याला ते विकले. बिश्नोई याने गोध्रा येथील रमेश वनकर याचा ट्रक भाड्याने घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.

मिश्रा याच्या मद्य उत्पादन कारखान्यात केवळ गुजरात आणि आंध्र प्रदेशसाठीच मद्याची निर्मिती केली जाते, अशी माहिती मिळाल्याने आता गुजरात पोलिस कारखान्यापर्यंत पोचणार आहेत. यावेळी या कारखान्यात नियुक्त केलेला अबकारी निरीक्षक नेमक्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र जारी करतो, हा महत्त्वाचा मुद्दा चौकशीच्या केंद्रस्थानी असेल, अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT