Goa Politics: कुडचडेत काँग्रेस,भाजप कार्यकर्ते संभ्रमात

Goa Politics: उमेदवार निश्‍चितीची प्रतीक्षा: पुढील राजकारणासाठी मोर्चेबांधणी सुरू
Goa Loksabha Congress
Goa Loksabha CongressDainik Gomanatk

Goa Politics:

श्यामकांत नाईक

लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली तरीही भाजपचा दक्षिणेतील उमेदवार अद्याप ठरलेला नाही. काँग्रेसकडून दक्षिण व उत्तर गाेव्यातून कुणाला उमेदवारी देणार हे गुलदस्त्यात असल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते गोंधळून गेले आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सध्या जोरदार प्रचाराच्या कामाला लागले असून काँग्रेस मात्र प्रचारकार्यात बराच मागे असल्याचे दिसून येते. दरम्यान, लोकसभेसाठी उमेदवार निश्‍चिती नसल्याने गोंधळ असला तरी, पुढील राजकारणाच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी मात्र सुरू आहे.

कुडचडे मतदारसंघात 2017 विधानसभा निवडणुकीत भाजपाचे नीलेश काब्राल यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी श्याम सातार्डेकर यांच्याविरोधात तब्बल नऊ हजार मतांची आघाडी घेऊन विजय मिळविला होता. पण 2019 च्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपाला कुडचडेतून अपेक्षित आघाडी मिळाली नव्हती व आताही भाजपला आघाडी मिळवून देण्यास भाजप कार्यकर्त्यांना काम करावे लागणार आहे.

Goa Loksabha Congress
Mhadei River: म्‍हादईच्‍या मुद्यावरून विरोधकांनी फटकारले

काब्रालांना करावा लागला होता संघर्ष

कुडचडे मतदारसंघात भाजपबरोबर काँग्रेस पक्ष कार्यकर्तेही बरेच सक्रिय असून हे त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले होते. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी या विधानसभेवेळी काब्राल यांना बराच संघर्ष करावा लागला पुन्हा ती स्थिती येऊ नये म्हणून काब्राल कामाला लागलेत. त्यातच मंत्रिपद काढून घेतल्याचा परिणाम होऊ शकतो,असे लोकांचे मत आहे.

Goa Loksabha Congress
ST Political Reservation: एसटी राजकीय आरक्षण; विजय सरदेसाईंचे कायदामंत्री किरेन रिजिजू यांना पत्र

रोहन गावस देसाईही सक्रिय

काब्राल हे जरी कुडचडेचे आमदार असले तरी यावेळी रोहन गावस देसाई हेही भाजपच्या कार्यात मोठ्या उत्साहाने भाग घेताना दिसत आहेत. पक्षात आपली छबी निर्माण करण्यासाठी रोहन गावस देसाई सुद्धा यावेळी प्रचारकार्यात उतरणार असल्याने यावेळी भाजपची ताकद वाढणार असे दिसून येते.

‘आरजी’ कार्यकर्तेही लागले कामाला :

कुडचडे मतदारसंघात काँग्रेस, भाजपबरोबरच आरजीचेही बरेच कार्यकर्ते असून त्यांनीही आपल्या कामाला सुरुवात केली आहे. गेल्या निवडणुकीत आरजीनेच निलेश काब्राल यांची खुर्ची धोक्यात आणली होती. जरी काँग्रेसचे व भाजपाचे उमेदवार जाहीर झाले नसले तरी सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी कामाला लागले असून खरी परीक्षा यावेळी नीलेश काब्राल यांचीच होणार,कारण ही निवडणूक रंगीत तालीम ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com